Posts

Showing posts from December, 2021

*निकोप हॉस्पिटल फलटणला, N. A. B. H. अभिमानास्पद मानांकन : डॉ. जे. टी. पोळ*

Image
बिजवडी : कृष्णामाई मेडिकल रिसर्च फौडेशन संचलित निकोप हॉस्पिटल, फलटणला N. A. B. H. (नॅशनल अक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स & हेल्थ केअर प्रोव्हायडर्स) या अभिमानास्पद मानांकनाने नुकतेच गौरविण्यात आले आहे.            समाजाचे आरोग्य निकोप, निरामय ठेवण्यात  दि. ९ जानेवारी १९९५ पासून रौप्य महोत्सवी तपोपूर्ती नंतरही सतत अग्रभागी  असलेल्या निकोप हाॅस्पिटलच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तूरा विराजमान झाला आहे.          सर्वाना येणार्‍या नववर्षाच्या पूर्वसंध्येला मनाःपासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करीत असतानाच हा संदेश प्राप्त झाल्याचे निकोपचे सर्वेसर्वा डाॅ. जे. टी. पोळ, डाॅ. सौ. सुनिता पोळ व कुटुंबियांनी कळविले आहे.       प्रामुख्याने हृदयरुग्ण, सर्प दंश, अपघातातील गंभीर रुग्ण व अन्य आजारातील गंभीर रुग्णावर खात्रीचे उपचाराची सुविधा, विशेषतः कॅथलॅब, उत्तम सी. टी. स्कॅन, एम. आर. आय. डायलिसीस, सुसज्ज आय. सी. यू. वगैरे सर्व वैद्यकीय साधने सुविधा, सुसज्ज लॅब यासह स्वतः डॉ.जे. टी. पोळ M. D. Medicine आणि डॉ. स...