कोळकीतील दुर्वांकुर व विसावा हॉटेलमधील कामगार घालतायत सोसायटीत धिंगाणा...! रहिवाशांचा संताप वाढला ; परराज्यातील व्यसनी कामगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी ; नागरीक त्रस्त
विशाल गुंजवटे : बिजवडी - कोळकी ता.फलटण येथील नामांकित दुर्वांकुर व विसावा हॉटेलमध्ये काम करत असलेल्या परराज्यातील कामगारांच्या असभ्य वर्तणुकीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.व्यसनाधीन कामगारांकडून रात्रीअपरात्री दंगा,आरडाओरडा,तसेच सार्वजनिक शिस्त भंग होत आहे.अशा व्यसनी कामगारां विरोधात रहिवाशी आक्रमक झाले असून या प्रकरणाकडे स्थानिक व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. कोळकी ता.फलटण येथील साईनंद सोसायटीमध्ये बहुतांश सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास असून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेली आहेत.मात्र सोसायटीतील काही फ्लॅटमध्ये हॉटेलमधील कामगार समूहाने राहत आहेत.रात्रीअपरात्री रूमवर येताना ते व्यसनी कामगार धिंगाणा घालत असतात.संबंधित कामगारांकडून गांजा, धूम्रपान व मद्यपान यांसारख्या व्यसनांचा खुलेआम वापर होत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकाराबाबत हॉटेल मालकांना अनेक वेळा सांगूनही त...