शिवसेना उपनेत्या ना.डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नातून चैतन्य रूग्णालय कोविडसाठी हस्तांतरित..!- शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले
बिजवडी - गोंदवले बु.ता.माण येथील ब्रम्हचैतन्य देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालय प्रशासनाने कोविड सेंटरसाठी अधिगृहित केले होते.विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना उपनेत्या ना.डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या प्रयत्नांतून देवस्थानचे ट्रस्टचे पदाधिकारी तसेच प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या सहकार्याने आज चैतन्य रूग्णालय लोकांच्या सेवेसाठी कोविड सेंटर म्हणून आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी दिली. संजय भोसले म्हणाले ,गोंदवलेतील चैतन्य रूग्णालय कोविड सेंटर करण्यासाठी ना.निलमताई गोऱ्हे यांचे विशेष प्रयत्न आहेत.प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून आज देवस्थानचे ट्रस्टी विश्राम पाठक व आरोग्य अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांच्यात समन्वय साधून रूग्णालय हस्तांतरित करण्यात आले. गोंदवले देवस्थान ट्रस्टचे चैतन्य रुग्णालयामध्ये पहिलेच ८ आॅक्सीजन बेड व इतर २१ बेडची सोय असून याठिकाणी २५ रूग्णांची सोय होणार आहे.या ट्रस्टने आरोग्य खात्याकडे अधिकची २०० काॅट्स ,गाद्या,बेडसिट व हजारो रुग्णांच्या ...