वडूज ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ..! बालचमूंच्या प्रयोगशील कृतीचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ट्रिनिटी स्कूलचे पालकांकडून कौतुक
बिजवडी : वडूज ता.खटाव येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे.विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना कायम प्रयोगशील व कल्पक बनवण्याकडे गुरूजनांचे लक्ष असते.या हेतूने स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात पीस हाऊस,हार्मोनी हाऊस,इंटेग्रिटी हाऊस,विस्डम हाऊस मधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला होता. ट्रिनिटी स्कूलच्या मार्गदर्शिका हर्षदा देशमुख-जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.याचे उदघाटन डॉ. रुपाली धामधरे यांचेहस्ते मुख्याध्यापिका मृदुला बॅनर्जी,सुरज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी अस्मिता भांडारी, माधुरी शिंदे, वैष्णवी गाढवे,सर्व शिक्षक,सेवक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक प्रेरणादायी गीत व नृत्याचे सादरीकरण केले.सौ.सोनाक्षी विजय इंगोले यांनी विज्ञानाचे महत्व सांगतिले. या प्रदर्शनात पीस हाऊस मधील श...