यार्दी सॉफ्टवेअर इंडीया प्रा.लि.पुणे कंपनीच्या दातृत्वामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोलाची मदत..! - राहूल शेंडे ; ऊर्मी संस्थेच्या माध्यमातून मोहोळ आणि धाराशिव येथील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे मोहोळ व धाराशिव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून यार्दी सॉफ्टवेअर इंडीया प्रा.लि.पुणे कंपनीने दातृत्व दाखवत या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदत केली आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोणताही अडथळा येऊ नये या हेतूने झालेली मदत मोलाची असल्याचे प्रतिपादन ऊर्मी संस्था पुणेचे राहूल शेंडे यांनी केले आहे. ऊर्मी संस्था पुणे यांच्या माध्यमातून यार्दी सॉफ्टवेअर इंडिया प्रा.लि.पुणे कंपनीच्या सी.एस.आर.निधीतून मोहोळ व धाराशिव परिसरातील पूरग्रस्त भागातील 300 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी यार्दी सॉफ्टवेअर कंपनीच्या दिपन्विता सेनगुप्ता,आदिती पटवर्धन, अर्पण बाखडे,ऊर्मी संस्थेचे राहुल शेंडे,राहुल चुनिदास,प्रज्वल पाटील, निवृत्ती बोडके, सारथी फाऊंडेशन चे रामचंद्र वाघमारे ,बजरंग होटकर,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मोहोळ व धाराशिव तालुक्यातील बाबुराव पाटील विद्यालय गोटेवाडी,जि.प. प्राथमिक शाळा दाऊतपूर, जि.प. प्राथमिक शाळा र...