Posts

Showing posts from September, 2025

सतिश ढोक अनार गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित..!

Image
बिजवडी,ता.28: बिदाल ता.माण येथील प्रगतशील डाळींब उत्पादक शेतकरी सतिश ढोक सर यांना  सोलापूर याठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांचेवतीने अनार गौरव २०२५ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  सोलापूर येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या २१ व्या स्थापना दिवस समारोहानिमित्त आयोजित 'राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा’ व 'राष्ट्रीय डाळिंब दिवस' साजरा करण्यात आला.यावेळी संशोधन केंद्राचा 21 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील काही निवडक शेतकऱ्यांना अनार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बिदाल येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचा गौरव करण्यात आला.  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे प्रकल्प संचालक व मँगनेट महाव्यवस्थापक विनायक कोकरे,फलोत्पादन संचालक अंकुश माने  कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ.राजीव मराठे,जिल्हा कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले,कृषी विश्व विद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ.विठ्ठल बेनागी,अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ पुणे अध्यक्ष प्रभाकर चांदणे, श्कर्नाटक डाळींब उत्पादक संघ बेंगलुरूचे उपाध्यक्ष न...

विवो चे सीएसआरमधून माणमधील शाळांना साहित्यरूपी मदतीतून सामाजिक कार्य...!- शिवकांत चव्हाण ; माण तालुक्यातील शाळांना हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे यांच्या सीएसआरमधून साहित्याचे वाटप ; इंटरअँक्टिव्ह पँनेल,प्रयोगशाळा साहित्य व बेचेंसचे वितरण

Image
बिजवडी,ता.18: हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे यांच्या सीएसआरमधून विविध शाळांना साहित्यरूपी मदत करून सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य केले जात आहे.विवो कंपनी,उर्मी संस्था व वैभव पोरे यांच्यासारखे समविचारी लोक एकत्र आले की सामाजिक कार्य घडते.बिजवडी येथील अनु.जाती विद्यालय विनाअनुदानावर चालवले जात असून या विद्यालयाला कंपनीच्या माध्यमातून सर्वतोपरि मदत करत त्यांचा शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही प्रतिपादन "हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे" या कंपनीचे फायनान्स मँनेजर शिवकांत चव्हाण यांनी केले.  बिजवडी ता.माण येथील श्री संत गाडगे महाराज अनु.जाती विद्यालय तसेच माण तालुक्यातील म्हसवड,पळशी,गोंदवले ,येळेवाडी याठिकाणी हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणे यांचे वतीने ऊर्मी संस्था पुणे यांच्या माध्यमातून व माणचे सुपुत्र वैभव पोरे यांच्या प्रयत्नांतून इंटरअँक्टिव्ह पँनेल,प्रयोगशाळा साहित्य व बेचेंसचे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हिसोआ इलेक्ट्रॉनिक प्रा.लि.विवो पुणेचे एच आर मॅनेजर सौम्या बक्ष...

बारामतीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार व भरारी यशाची कार्यक्रम संपन्न..! लातूर सायन्स अकँडमीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव

Image
बारामतीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार व भरारी यशाची कार्यक्रम संपन्न..! लातूर सायन्स अकँडमीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव बारामती : “भरारी यशाची व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” हा सोहळा लातूर सायन्स अ‍ॅकॅडमी बारामती येथे SPCT’s EXED ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, बारामती आणि लातूर सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.  या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, वर्धमान विद्यालय वालचंदनगर चे प्राचार्य प्रा. कुंभार सर उपस्थित होते.या कार्यक्रमात नीट,जीई व एमएचटी -सेट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता १२ वीमध्ये टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ जिल्ह्यातील तब्बल ७२ गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्...