Posts

Showing posts from February, 2022

बिजवडी सोसायटीवर महाविकास आघाडीचे १२-१ ने वर्चस्व..!

Image
बिजवडी - ता.माण येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस - राष्ट्रीय कॉग्रेस - शिवसेनेच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पँनेलने भाजप - रासप- शेखर गोरे गट पुरस्कृत पँनेलचा १२-१ ने पराभव करत सोसायटीवर वर्चस्व मिळवले आहे. बिजवडी सोसायटी निवडणूकीत महाविकास आघाडीच्या पँनेलमधून शंकर बापू जाधव ,बापू जोतीराम दडस ,विकास जिजाबा निंबाळकर , लालासो गणपत पवार ,कुंडलिक दादासो भोसले ,जनार्दन बाबुराव भोसले ,प्रज्योत हणमंत भोसले ,रुक्मिणी पंढरीनाथ भोसले ,कमल आनंदराव विरकर ,पांडुरंग नाना साळुंखे ,यशवंत म्हंकाळ गाढवे ,अशोक रघुनाथ अडागळे तर भाजपकडून संजय दादासो भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी महाविकास आघाडीप्रणित पँनेलचे राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे अँड.कुंडलिक भोसले ,रंगाशेठ भोसले ,उपाध्यक्ष विकास निंबाळकर यांनी नेतृत्व केले होते.राष्ट्रीय कॉग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले यांनी तर शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी नेतृत्व केले होते.तर पराभूत झालेल्या पँनेलचे भाजपतर्फे माजी उपसरपंच संजय भोसले ,रासपतर्फे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर तर शेखर गोरे गटातर्फे म...

🌸सौ सुसाई, दुर्गा, महालक्ष्मी, माता च🌸*

Image
🌸सौ सुसाई, दुर्गा, महालक्ष्मी, माता च🌸*    धन्य ती माता जिने, नवऱ्याच्या काळात निदान वंशाचा वारस पुत्राचे काळात दिवस पालटतील पण सुसंस्कार,अन जिद्द सोडायची नाही. मग तोरा नणंद बाईचा,नाहीतर सासू बाईचा असू दे..? धन्य ती माता आशा अर्थाने की, आदरणीय वहिनी साहेबांनी कुडा ला मेडीचा आधार म्हणूनच गुंजवटे दादा नं चा प्रपंच पेलला.🥁.        पण त्याची जाणीव ठेऊन आभाळाला गवसणी घालणाऱ्या सुपुत्राने ही आई बद्दल भरभरून वास्तव मांडलं हे च त्या माता माऊलीचे संस्कार..🚩👍. गुंजवटे दादा अन वहिनी नं च्या जिद्दी बद्दल काय लिहावे..? जवळ पास सर्व ताई माईंचे विवाह प्रसंग, किंवा बिजवडीतील जुना झोपडी महाल मी अनेकदा अन्नपूर्णेच्या हातचे जेवलो आहे. दादांची पत्रकारिता नेटकी, पण दारू मुळें कर्तबगारी फाटकी च होती. मी ,अनाथ समाज्याचीआई,सिंधुताई, माझी आई सखुबाई, अन  गुंजवटे दादांची प्रसंगी झालेल्या आई म्हणून सौ वहिनी साहेबांना पाहिलं आहे..? हो य आई च..!मित्रांनो, कारण वात्सल्य आणि प्रोत्साहन फक्त आई च देते. निराश प्रसंगी नक्की धीर देते ती आई च..!       ...

माझी आई .....सुसाई @ ६६

Image
माझी आई.......सुसाई आज तिचा ६६ वा वाढदिवस त्यानिमित्त ......  आईविना पोरकी असलेली अन वडीलांचा हात डोक्यावर नसताना मामांच्या छत्रछायेखाली वाढलेली माझी आहे सुसाई (सुशिला). लग्नाअगोदर ही अन लग्नानंतरही गरीबी तिच्या पाचवीलाच पुजलेली.मामाच्या घरी राहायच म्हणजे उपकाराचे ओझे डोक्यावर घेऊनच राहणं...बर आपल्या बरोबर भावालाही तिथच सांभाळायच अशी मोठी जबाबदारी तिच्यावर...मामा- मामी नेही आपल्या तीन मुलांसह ही पोरकी दोन मुले चांगल्या पध्दतीने सांभाळली.निदान लग्नानंतर तरी सुसाईच नशीब उघडल या आशेवर बिजवडी येथील गुंजवटे या गरीब कुटुंबात तिच लग्न लावून देण्यात आल.पण कशाच काय अजून नशीबात त्रासच लिहून ठेवला होता.मामाच्या घरात पोरकेपणाची कधी जाणीव न झालेल्या माझ्या आईला सासरी आल्यावर मात्र सासू काय असते ,नंणंद काय असते याची खरी जाणीव झाली.सासू सुनेचा त्रास सहन करत संसाराचा गाडा ती ओढत राहिली. पतीराजांना त्रास पाहवत नसला तरी आईपुढे त्यांचे काय चालत नव्हते.मात्र आपल्या घासातला घास ते आईला देत होते.दादांना पहिल्यापासूनच जेवणाबरोबर भजी खायची मोठी हौस. आजही ते सांगतात सुशीला सर्वांसमोर भजी देता य...