Posts

Showing posts from October, 2021

माझा गड माझा अभिमानातंर्गत वारूगडला भव्य किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा..!

Image
बिजवडी - गडकोट हेच स्वराज्याचे सार  हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले विचार आपण पिढ्यानपिढ्या दिवाळी सणामध्ये किल्ले बांधून जपले आहेत. दिवाळी मध्ये किल्ले बांधणे ही एकमेव महाराष्ट्रामध्ये जपलेली परंपरा आहे. बालमनाला किल्ले संवर्धन, किल्ले स्वच्छता आणि किल्ल्याचे महत्व पटावं म्हणून किल्ले वारूगड ता.माण येथे दुर्गप्रेमींकडून दिपावलीचे औचित्य साधत दि.३० ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत भव्य किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजकाच्यावतीने देण्यात आली आहे. या स्पर्धेत इयत्ता अंगणवाडी ते चौथी ,इयत्ता पाचवी ते आठवी ,इयत्ता ९ वी पुढे वय मर्यादा नाही असे तीन गट पाडण्यात आले आहेत.स्पर्धेत प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांकाना आकर्षक बक्षीस , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी आपले नाव , वय ,इयत्ता , पत्ता , शाळेचे नाव , संपर्क क्रमांक व आपण बनवलेल्या किल्ल्यांचे पाच फोटो व्हॉटसपवर स्पर्धा कालावधीत पाठवावेत. किल्ल्यांचे चार फो...

चोरी प्रकरणातील ५ वर्षे फरार आरोपीस अटक..!दहिवडी पोलीसांची कामगिरी

Image
बिजवडी - मौजे किरकसाल ता.माण येथील चोरी प्रकरणातील पाच वर्षे फरार असलेल्या आरोपीस ताब्यात घेतल्याची माहिती दहिवडी पोलीस स्टेशनचे सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली. मौजे किरकसाल ता.माण येथील एकनाथ महादेव अवघडे यांचे बंद घराचे कुलूप तोडुन अज्ञात इसमाने त्यांचे घरात ठेवलेली बजाज प्लॅटीना मोटार सायकल क्रमांक एम.एच ११.ऐ.एन.६९७७ हि दुचाकी चोरीस गेली होती. दहिवडी पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासांत गुन्हयातील चोरीस गेलेली मोटार सायकल हि नितिन प्रकाश तुपे रा.आगाशिवनगर कराड ता. कराड याचे ताब्यात दिनांक २१/१२/२०१६ रोजी मिळुन आलेने त्यास सदर गुन्हयाचे कामी यापुर्वी अटक करण्यात आली होती.सदर गुन्हयाचे तपासांत मारुती शामराव तुपे रा.आगाशिवनगर कराड ता.कराड जि.सातारा हा निष्पन्न झाला होता. व तो गुन्हा घडलेपासुन फरारी होता.दिनांक १९/१०/२०२१ रोजी दहिवडी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, सदर गुन्हयातील फरारी आरोपी मारुती शामराव तुपे हा किरकसाल ता.माण जि.सातारा या गांवी येणार असलेची माहिती मिळाल्याने त्यास किरकसाल ता.माण गांवी' सापळा रचुन शिताफीन ताब्यात...

वाघजाई देवराईत ऑक्सिजन पार्क निर्मिती साठी वृक्षारोपण...!

Image
बिजवडी - मौजे धामणी ता.माण येथील वाघजाई देवी ही परिसरातील अनेक गावांमध्ये जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.मंदिर परिसरात पर्यावरण मित्र व बहुउद्देशीय संस्था भारत, पानी फाऊंडेशन,सह्याद्री देवराई,सामाजिक वनीकरण ,ग्रामपंचायत धामणी आणि युवा मंडळे या सर्वांच्या माध्यमातून वाघजाई देवी मंदिर परिसराचे सुशोभीकरण आणि इको.ऑक्सिजन पार्क निर्मितीचे कार्य हाती घेण्यात आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून वाघजाई देवी मंदिर परिसरात शेकडो वृक्षांचे नियोजनपूर्वक वृक्षारोपण करण्यात आले. या मंदिराचा निसर्गरम्य परिसर भाविकांच्या मनाला शांतता आणि समाधान मिळवून देतो.या देवीच्या मंदिराचे बांधकाम तोडीव दगडात रेखीवपणे केले आहे.मंदिरातील प्रसन्न भाव मुद्रा असलेली वाघजाई देवीची मूर्ती अनेकांच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान निर्माण करते.मंदिराच्या जवळच पाण्याचा तलाव आहे.पिंपरण आणि आम्र वृक्षांच्या गर्द सावलीतील ह्या मंदिर परिसरात थकल्या भागल्या मनाला क्षणभराचा विसावा मिळतो.मंदिरासमोर मोठा आर सी सी मंडप आहे.त्यात सुंदर असे सुविचार लेखन केले आहे.वृक्षांना व इतर पाणी व्यवस्थेकरिता...

श्रीमती सुमती गुरसाळे यांचे निधन..!

Image
बिजवडी - हुतात्मा परशुराम विद्यालय ,वडूज येथील माजी शिक्षक व  प्रसिद्ध ज्योतिषी स्व.चंद्रकांत गुरसाळे सर यांच्या पत्नी श्रीमती सुमती गुरसाळे यांचे वयाच्या ७४ व्या वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा असून वडूजच्या सहाय्यक निबंधक सौ.विजया बाबर यांच्या त्या मातोश्री आहेत.तसेच मुलगा संतोष गुरसाळे खारघर येथे डॉक्टर असून सूनबाई सौ.माया गुरसाळे भारत पेट्रोलियम च्या गँस विभागात अधिकारी आहेत. फोटो - श्रीमती सुमती गुरसाळे

एन .एच .जाधव यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत...! -प्राचार्य आर .डी. गायकवाड

Image
बिजवडी - पाडळी (निनाम )ता.सातारा येथील इंग्लिश स्कुल व स्व.तानाजी बंडू ढाणे ज्यु .कॉलेजचे प्राचार्य नंदकुमार हरिश्‍चंद्र जाधव यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आदर्शवत असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्राचार्य आर.डी.गायकवाड यांनी केले.   पाडळी (निनाम) ता.सातारा येथे सौदागर मंगल कार्यालयात सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.विभागीय अधिकारी आर.एस साळुंखे ,पोपटराव काटकर , अध्यक्ष बी.जे दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला .  गायकवाड म्हणाले ,जाधव सरांचे शैक्षणिक सेवेसाठी त्यागमय जीवन जगत रयत शिक्षण संस्थेची सेवा केली आहे.त्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदी व निरोगी राहावे अशी आशाही व्यक्त केली. सत्कारमूर्ती जाधव म्हणाले , माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनातून रयत शिक्षण संस्था वजा केली तर मागे काहीच शिल्लक राहणार नाही.संस्थेचे स्थान आपल्या हृदयात कायम राहील अशी कृतज्ञता व्यक्त केली .कार्यक्रमाच्या निमित्ताने उभयतांचा सत्कार शाखेच्या वतीने करण्यात आला . कार्यक्रमाप्रसंगी कुटुंबीय , आप्तेष्ट,स्कूल कम...

दहिवडीत गुटखा प्रकरणी दहिवडी पोलीसांची कारवाई...!

Image
बिजवडी - दहिवडी ता.माण येथे पोलीस स्टेशनने दहिवडीत एक लाख ५६ हजार रूपयांचा गुटखा जप्त केला असून या प्रकरणी सुखदेव राजू शिंदे यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सपोनि संतोष तासगावकर यांनी दिली.    गोपनिय माहीतीचे आधारे दहिवडी पोलीसांनी शिंदे मळा दहिवडी ता.माण येथे सुखदेव राजु शिंदे यांचे पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकुन केशरयुक्त पान मसाला व तंबाखूचे सहा  पोती अंदाजे १ लाख ५६ हजार रूपये किंमतीचा गुटखा  हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी श्रीमती अस्मिता गायकवाड अन्न सुरक्षा अधिकारी ,अन्न औषध प्रशासन विभाग सातारा यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार संबंधितावर  दहिवडी पोलीस स्टेशनला गु.र.न. ३०३/२०२१ अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल , अप्पर पोलीस अधिक्षक अजित बो-हाडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर ,पी. जी. हांगे ,एस.एन.केंगले ,आर.एस.बनसोडे यांनी केली आहे.

जिल्हा बँकेत माणमधून चांगला माणूस पाठवा...!- ना.रामराजे ना.निंबाळकर ;

Image
बिजवडी -जिल्हा बँकेची निवडणूक लागतेय.बँकेत चुकीच्या माणसाला निवडून दिलं की त्याचा त्रास बँकेबरोबरच आम्हाला सहन करावा लागतोय.चुकीच्या माणसामुळे राज्यात आदर्शवत असलेल्या जिल्हा बँकेचे नाव खराब होेतेय.त्यामुळे मी आपणा सर्वांना एकच विनंती करतोय की निदान यावेळी तरी माणमधून चांगला माणूस संचालक म्हणून निवडून द्या...असा उपरोधीक टोला विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे ना.निंबाळकर यांनी नाव न घेता आमदार जयकुमार गोरेंना दिला आहे. निमित्त होतं.... ते दहिवडी ता.माण येथील एका कार्यक्रमाचे....या कार्यक्रमात त्यांनी जिल्हा बँकेच्या निवडणूकीचा विषय काढला होता. यावेळी बोलताना रामराजे ना.निंबाळकर म्हणाले ,काहीजणांचा मुक्काम दिल्लीत अमित शहा व मुंबईच्या ईडीच्या कार्यालयात दिसून येतोय.ईडीकडे तक्रारी केल्या जात आहेत.आपली जिल्हा बँक एक नंबरची बँक आहे.कोणीही काही चुकीचे प्रकार केले तरी बँक कधीच अडचणीत येणार नाही.अशा लोकांच्याविषयी बोलणारा फक्त मीच आहे.त्यांच काय करायच ते आमदारकीच्या वेळेस पाहूच असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. पण निदान त्यावेळी ठरवताना मला बोलवा ...असा सूचक टोलाही त्यांनी माणमधील ...