...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!
क्रांतिकारी सातारा जिल्ह्यात पत्रकारितेत जेष्ठ पत्रकार म्हणून आजही माण तालुक्यातील बिजवडी गावचे बापूराव लक्ष्मण गुंजवटे दादा यांचे नाव घेतले जाते.त्यांनी आपल्या परखड व निर्भिड लेखणीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता करत असताना आज दि.15 जानेवारी रोजी त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त.... माण तालुका पत्रकार संघाचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार बापूराव लक्ष्मण गुंजवटे (दादा ) यांनी बिजवडी ता.माण डेटलाईनवरून सन १९८१ सालापासून दैनिक शिवसंदेश,दै.ग्रामोध्दार, दै.कर्मयोगी,दै.सह्याद्री एक्सप्रेस ,दै.तरूणभारत, दै.ऐक्य,दै.पुण्यनगरी ,दै.लोकमत आदी दैनिकात तसेच विविध साप्ताहिकात अविरतपणे सामाजिक ,राजकीय,शैक्षणिक,क्रिडा क्षेत्रात निर्भिडपणे लिखाण केले आहे.सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याबरोबरच चूकीच्या पध्दतीने वागणाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे कामही त्यांनी केले आहे.कोणाचीही लाचारी न पत्करता स्वाभिमानाने निर्भिड लिखाण केल्याबद्दल तसेच पत्रकारितेतले भीष्माचार्य म्हणून उपाधी देत विविध दैनिके साप्ताहिके,संस्था,मंडळे ,माणदेश फौंडेशन पुणे, फलटण ...