"थुंकना मत....नही तो देवकर आ जाएगा,,...! माणदेशी पोलीसाची होती मुंबईत दहशत ; स्वच्छता प्रेमी शिवाजी देवकर यांच्या कार्याचा महानगरपालिकेने केलता गौरवआजही या नावीन्यपूर्ण उपक्रमाची गरज
विशाल गुंजवटे : सकाळ वृत्तसेवा बिजवडी : समाजात पान,गुटखा,तंबाखू खाणाऱ्या आंबट शौकीनांची कमी नाही.ते खाल्ल्यानंतर हे शौकीन लोक सार्वजनिक ठिकाणं, शाळा तसेच विविध इमारतीच्या भिंती,रस्ते,बस, रेल्वे आदी ठिकाणी काहीही न पाहता आपल्या तोंडातली घाण ते नेहमी थुंकून टाकत असतात. काही सार्वजनिक ठिकाणं तर थुंकून...थुंकून या लोकांनी भिंती लाल कलर दिल्यासारख केल्या आहेत.अशा शौकीनांना कोणत्याही कायद्याची ना कोणाचीही भीती वाटत नाही.मात्र काही वर्षापूर्वी मुंबईत एका माणदेशी पोलीसाची एवढी दहशत होती की त्यांच्या भीतामुळे त्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोणी थुकंण्याचे धाडस करत नव्हते.अन कोणी थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना इतर लोक बोलत होती की,इस इलाके मे... थुंकना मत नही तो देवकर आ जाएगा...!आपल्या माणदेशीचा सुसंस्कृतपणा,शिस्त व स्वच्छतेचा मूलमंत्र त्यांनी आपल्या सेवेतही जपला होता. माण तालुक्यातील शिवाजी देवकर यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव माणदेशाबरोबरच मुंबई महानगरपालिकेनीही केला होता.आजही सर्वत्र स्वच्छतेचा मूलमंत्र जपणे गरजेचा आहे मात्र यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी देवकर सारख्या लोकांची स...