Posts

Showing posts from August, 2024

साईराज साळुंखे याचे बुध्दीबळ स्पर्धेत यश..!

Image
बिजवडी,ता.27: वडूज ता.खटाव येथील त्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमधील साईराज साळुंखे याने खटाव तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळविला आहे.त्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.  शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथे या स्पर्धा संपन्न झाल्या.साईराज साळुंखे याला शाळेचे क्रीडाशिक्षक रियाज आतार यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल साईराज साळुंखे याचे शाळेच्या संचालिका सौ.हर्षदा देशमुख-जाधव, मुख्याध्यापिका सौ.मृदुला बॅनर्जी, शाळेचे व्यवस्थापक सुरज भोसले,  महेश मममदापुरे व सर्व शिक्षक ,कर्मचारी वर्ग,विद्यार्था यांनी अभिनंदन केले. फोटो - वडूज ता.खटाव येथील तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेत यश मिळवल्यानंतर साईराज साळुंखे याचा सत्कार करताना मान्यवर

दहिवडी येथील रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न..!

Image
बिजवडी : दहिवडी ता.माण येथील रयत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू शाखा दहिवडी यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न झाला.  याप्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या आदरणीय प्रियांका बहनजी व आदरणीय उषा बहन जी यांनी सर्व शिक्षिका व शिक्षकांना राखी बांधून रक्षाबंधनाचे महत्त्व समजावून सांगितले याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव उपस्थित होत्या .त्यांनाही आदरणीय प्रियांका बहन जी यांनी राखी बांधली.  मुख्याध्यापिका सौ.भारती जाधव यांनी शाळेत राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती आदरणीय बहनजी यांना दिली.  खिलारे सर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे आभार मानले.व अतिशय उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. फोटो - दहिवडी ता.माण येथे रयत इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रक्षाबंधन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर व शिक्षकवर्ग...

रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीत स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

Image
बिजवडी - रयत इंग्लिश मीडियम स्कूल, दहिवडी येथे अतिशय उत्साही वातावरणात 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.  मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.चारही हाऊसचे विद्यार्थी तसेच स्काऊट गाईडचे विद्यार्थी व नर्सरी ते सिनियर के.जी.बनी ग्रुप यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संचलन केले. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. झांज पथकाच्या प्रदर्शनासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक प्रशांत राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अतिशय सुंदर अशा पद्धतीने झांज पथकास नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मुलांना समजावून सांगितले. व स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपण काय केले पाहिजे हेही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. मुख्याध्यापिका जाधव मॅडम यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या भविष्यकालीन योजना बद्दलची माहिती पालकांना व नागरिकांना दिली तसेच स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना कित...

साखरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विक्रम ढेंबरे यांची बिनविरोध निवड...!

Image
विशाल गुंजवटे : बिजवडी - साखरवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायतीच्या नूतन उपसरपंचपदी विक्रम बबनराव ढेंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  साखरवाडी ता.फलटण येथील ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती.या निवडणूकीत राजे गट विरूध्द विक्रम भोसले अशी लढत दिसून आली.या निवडणूकीत किंगमेकरची भूमिका बजावत विक्रम भोसले यांनी आपल्या कल्पक नेतृत्वाच्या जोरावर व जनतेच्या आशीर्वादावर राजे गटाच्या विरोधात एकतर्फी खिंड लढवली.यात ऐतिहासिक विजय मिळवत ग्रामपंचायत ताब्यात घेत असताना किंगमेकर विक्रम भोसले यांना त्यांचे सहकारी विक्रम ढेंबरे खंबीरपणे पाठीशी उभे राहत निस्वार्थीपणे मोलाची साथ दिली.त्यांच्यासह इतर सहकाऱ्यांच्या साथीमुळेच विक्रम भोसले ग्रामपंचायतीत किंगमेकर बनू शकले.  त्यावेळी सरपंचपदी सौ.रेखा संजय जाधव यांची निवड झाली होती.तर उपसरपंचपदी अक्षय रूपनवर यांची निवड करण्यात आली होती.त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडीची प्रक्रिया नुकतीच ग्रामपंचायतच्या सरपंच सौ रेखा संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  रि...