Posts

Showing posts from January, 2024

अयोध्येतील सोहळ्यासाठी अक्षयमहाराज भोसले यांना विशेष निमंत्रण

Image
बिजवडी:अयोध्येत पार पडणाऱ्या ऐतिहासिक भगवान श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण माण तालुक्यातील संत साहित्य अभ्यासक कीर्तनकार अक्षयमहाराज भोसले यांना मिळाले असून ते या भव्यदिव्य कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत.   या सोहळ्यास शंकराचार्य,धर्मपिठांचे आचार्य, महामंडलेश्वर,राष्ट्रसंत यांना आमंत्रित करण्यात आले आहे.आपल्या आध्यात्मिक कार्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संदेश देण्याचे काम अक्षयमहाराज भोसले यांनी केल आहे. दुष्काळग्रस्त भागातील त्यांची कीर्तन मालिका हा लोकांचा जिव्हाळ्याचा विषय होता.नानाविध वृत्तपत्रे ,मासिके या माध्यमातून त्यांचे लिखाण नियमित प्रसिद्ध होत असते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील  ते महत्त्वाचा दुवा मानला जातात.आपल्या घरातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी ५००० पेक्षा अधिक ग्रंथ व साहित्य ग्रंथालयाची सुरुवात केली.अनेको विद्यार्थी त्या माध्यमातून अभ्यास करत आहेत.  महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये वारकरी संप्रदाय युवा मंचच्या माध्यमातून संत साहित्य घराघरात पोहोचवण्यासाठी सन २००९ पासून...