Posts

Showing posts from October, 2024

वडूज येथील त्रिनिटी इंटरनँशनल स्कूलमध्ये कार्निवल महोत्सव संपन्न..!

Image
बिजवडी,ता.21: वडूज ता.खटाव येथील त्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्निवल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाला विद्यार्थी तसेच पालकवर्गांनी उत्सफूर्तफणे सहभाग दाखवला होता.  या महोत्सवामध्ये भारताच्या पूर्व विभाग,पश्चिम विभाग,दक्षिण विभाग व उत्तर विभागातल्या कला, संस्कृती दर्शवणारे व त्यांचे महत्त्व जाणवणारे चित्रण करत त्याचे प्रदर्शन मांडले होते.हे पाहण्यासाठी वडूज नगरीतील सर्व नागरिकांनी व शाळेच्या पालकांनी उत्सफूर्तपणे उपस्थिती दर्शवली होती.प्रत्येक विभागामध्ये त्या विभागाचे महत्त्व जाणवणारे तसेच महत्त्वाच्या बाबींना उजाळा देणाऱ्या प्रतिकृती उभारल्याने मुलांना आपल्या देशातील विविध भागाची तसेच संस्कृतीची माहिती होण्यास मदत मिळाली.  तसेच विद्यार्थी व पालक यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व खेळाचे स्टॉल लावले होते याचाही सर्वांनी आनंद घेतला.  ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे अध...

तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत रयत इंग्लिश मिडीयम स्कूलचे उज्वल यश...!

Image
बिजवडी : माणदेशी चॅम्पियन्स म्हसवड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत दहिवडी ता.माण येथील रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक व सांघिक खेळात उज्वल यश मिळवले आहे.  महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक कल्याण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा आयोजित जिल्हास्तरीय आट्यापाट्या खेळाच्या स्पर्धेत रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 वर्षांखालील मुलींचा संघ उपविजेता ठरला.त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.या संघात इकरा इम्रान तांबोळी,अपेक्षा भाऊसाहेब जाधव,अलविरा वसीम तांबोळी,सेंजल माधव भोंडवे,कल्याणी सचिन चव्हाण,अक्षरा वैभव गुरसाळकर,अक्षरा भिंगारे,गौरी जाधव,लीना नंदकुमार शिंदे,स्फूर्ती संतोष इंगळे,श्रेया कांतीलाल खाडे पाटील यांनी सहभाग घेतला होता.तसेच इयत्ता 10 वी च्या विराज पवार यांने गोळफेक या वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवले.   या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ दहिवडी तसेच शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापिका सौ.भारती प्रदीप जाधव यांनी सर्व खेळाडू विद्यार्थि...

बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड ...!

Image
बिजवडी,ता.10: बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ सातारा जिल्हा अध्यक्ष पदावर संतोष शिवाजी पवार यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एस आर भोसले यांनी नियुक्ती केली आहे.  सांगली येथे पार पडलेल्या विभागीय बैठकीला कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय दिनकर खरात व प्राथमिक शिक्षक संघाचे सुरज तुपे उपस्थित होते .बहुजन अधिकारी कर्मचारी यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे संघटन राज्यात कार्यरत असून सातारा जिल्हयात या महासंघाची जबाबदारी संतोष पवार यांच्यावर देण्यात आली आहे .  या निवडीबद्दल संतोष पवार यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर ,माण चे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश गंबरे आणि प्राथमिक शिक्षक समिती,प्राथमिक शिक्षक संघ,कास्ट्राईब शिक्षक संघटना,प्रहार शिक्षक संघटना,जूनी पेन्शन संघटना,क्रास्टाईब शिक्षक संघटनेचे माण तालुकाध्यक्ष लक्ष्मण महानवर,पदवीधर शिक्षक संघटना,जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटना,फूले शाहू आंबेडकर विद्वत सभा ग्रामसेवक संघटना ,या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले . फोटो - बहुजन अधिका...