Posts

Showing posts from April, 2025

उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे यांची सामाजिक बांधीलकी..! मळे (पुणे) येथील जि.प.शाळेला शैक्षणिक डिजीटल साहित्याचे वितरण

Image
बिजवडी,ता.13: पुणे येथील उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे (SAKA Engineering systems  Pvt Ltd , Pune) यांचे आर्थिक सहयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळे ,ता.भोर जि.पुणे येथे Empower to Education प्रकल्पांतर्गत शालेय विद्यार्थ्यासाठी Interactive Digital Panel with Balbharti software बसवण्यात आले आहे.उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे यांनी जि.प.शाळेला शैक्षणिक डिजीटल साहित्याचे वितरण करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.  ग्रामीण व अतिदूर्गम भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या नवनवीन वाटा आत्मसात करता याव्यात, आधुनिक शिक्षणाची दालनं त्यांच्यासाठी खुली व्हावीत या उद्देशाने या शाळेला डिजीटल साहित्य देण्यात आले आहे.या पॅनलचे उदघाटन व शालार्पण समारंभ शुक्रवार दि  ११-४- २०२५ रोजी संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे साहेब ,उर्मी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे साहेब,अनिता कापरे मॅडम,सायली फडके मॅडम, Sakaकंपनीच्या वतीने सारीका थिगळे मॅडम व त्यांचे सहकारी तसेच केंद्रप...