मित्सुबिशी एलिवेटर्सच्या सीएसआर निधीतून जि.प.शाळांना डिजीटल साहित्याचे वितरण..!उर्मी संस्थेच्या प्रयत्नातून वेल्हा तालुक्यातील जि.प.शाळा होणार डिजीटल
बिजवडी - पुणे येथील मित्सुबिशी एलिवेटर्स यांच्या सीएसआर निधीअंतर्गत व ऊर्मी संस्था, पुणे यांचे माध्यमातून वेल्हा तालुक्यातील केळद , पासली,वेल्हा बु.,अंत्रोली,धानेप, पाबे येथील जि.प.शाळांना एम्पॉवर टू एज्युकेशन प्रकल्पांतर्गत इंटर ऍक्टिव्ह स्मार्ट बोर्डस आणि बालभारती अभ्यासक्रम असलेला पेनड्राइव्ह देण्यात आले आहेत. केळद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता बघून मित्सुबिशी एलिवेटर्स चे पुणे विभाग प्रमुख अनिल समर्थ यांनी या शाळेतील दोन विद्यार्थ्यांचं इ.१० वी पर्यंतचं शैक्षणिक पालकत्व घेतले. यावेळी बोलताना ऊर्मी संस्थेचे सचिव राहुल शेंडे म्हणाले,ग्रामीण व अतिदुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या नवनवीन वाटा आत्मसात करण्यात वाकबगार व्हावेत,आधुनिक शिक्षणाची दालनं त्यांच्यासाठी खुली व्हावीत हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाप्रसंगी मित्सुबिशी एलिवेटर्स कंपनीचे पुणे विभाग प्रमुख अनिल समर्थ, एच आर मॅनेजर सुमीत खराबे, कंपनीचे इतर सदस्य,मार्गदर्शक वैभव पोरे,सर्व जि.प.शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. फोटो - वेल्हा तालुक्यातील जि.प.शाळांना इंटर ऍक्ट...