Posts

Showing posts from June, 2021

लॉकडाऊन उठताच महावितरणची सक्तीची वीजबील वसूली..!- नारायण अहिवळे

Image
बिजवडी - कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेले दिड वर्षेपासून वारंवार लॉकडाऊन टाकले जात आहे.त्यामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योग , व्यवसाय ,रोजगार बंद असल्याने आर्थिक समस्येने नागरीकांना त्रासले आहे.त्यातच लॉकडाऊन उठताच महावितरणने सक्तीची वीजबील वसूली मोहिम राबवल्याने नागरीक हतबल होत आहेत. सर्वसामन्य ,गोरगरीब , व्यावसायिकांनी वीजबील भरायचे कसे हा प्रश्न पडला आहे.महावितरण ने वीजबील वसूली साठी नागरीकांना थोडी सवलत देता आली नाही तरी किमान वीजबीलात दोनतीन टप्पे करून देण्याची मागणी स्वाभिमानी  होलार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण अहिवळे यांनी केली आहे.   माण तालुक्यासह दहिवडी विभागात वीजबील वसूली मोहीम सुरू आहे. लॉकडाऊन उठवल्याने आता कुठे सर्वकाही सुरू झाले असले तरी व  रोजगारांना लगेच रोजगार उपलब्ध होणार नाही. व्यवसाय ,व्यापार , दुकानदारी म्हणावी तशी अजून सुरू झाली नाही.त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे .ते कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.यात  त्यातच महावितरण कडून सक्तीचे वीज बिल वसुली सुरू आहे. कोणताही विचार न करता, पूर्व कल्पना न...

पायी वारी हा वारकऱ्यांचा अधिकार...!-ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले ; शासनाने निर्णयाचा फेरविचार करावा

Image
बिजवडी - पंढरपूरच्या पोटनिवडणूकीसाठी राज्यकर्त्यांना सभा ,मेळावे,मतदानास परवानगी मिळते.त्यावेळी कोरोना दिसत नाही अन वारीच्या वेळेस पायी वारीला परवानगी नाकारली जाते का तर त्यावेळी कोरोना दिसतो.शासनाच्या या दुटप्पी धोरणाचे विशेष वाटते. वारकऱ्यांना पायी वारी करण्याचा अधिकार आहे.त्यामुळे शासनाने वारकरी संप्रदायाच्या पायी वारीच्या आग्रही मागणीचा विचार करून निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी वारकरी युवा संप्रदायचे राज्याचे अध्यक्ष ह.भ.प.अक्षयमहाराज भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.   कोरोनाचे वाढते प्रमाण , कडक लॉकडाऊन तरीही पंढरपूर सारख्या ठिकाणी हजारोंचे उपस्थितीत राजकीय  मेळावे होऊ शकत होते.मंत्री मंडळ तथा विरोध पक्षाचे सर्व नेते पंढरपूरात रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. त्यावेळी कोरोना फिरायला बाहेर गेला होता का..? अन आता माऊलींची वारी आली आहे त्यामुळे तो माघारी येईल असे शासनाला वाटतेय.शासनाच्या या सापत्नपणाच्या वागणूकीचा व माऊलींच्या पायीवारी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाचा वारकरी सांप्रदायातर्फे निषेध करण्यात येत आहे.  कोरोना काळात वारकरी सर्व नियमांच...

माण तालुका राष्ट्रीय कॉग्रेसच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची निवड...!

Image
बिजवडी - महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे  चिटणीस दादासाहेब काळे (रा.आंधळी ,ता.माण)यांची माण तालुका राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.   माण-खटाव विधानसभा युवक कॉग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना  दादासाहेब काळे यांनी युवकांची मोठी फळी तयार केली होती.युवकांच्या माध्यमातून ते पक्षवाढीचे काम करत असतानाच त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्टींनी घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या चिटणीसपदावर काम करण्याची संधी दिली होती. या कालावधीतही त्यांनी विविध मेळावे , शिबीरे ,कार्यक्रम घेऊन आपले कार्य दाखवून दिले होते.त्यामुळे पुन्हा एकदा याच कार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांची चिटणीसपदी फेरनिवड केली होती. त्यांचे युवासंघटन व पक्षहिताचे काम पाहून सर्वांना सोबत घेऊन माण तालुका काँग्रेसमय करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका चांगल्या युवा कार्यकर्त्याची निवड करत त्यांच्यावर माण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.या निवडीचे पत्र मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले. दादासाहेब...