Posts

Showing posts from December, 2023

येळेवाडी आश्रमशाळेत गाडगे बाबा पुण्यतिथी सोहळा संपन्न..!

Image
बिजवडी,ता.20: येळेवाडी ता.माण येथे श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळा तसेच प्राथमिक, माध्यमिक अनु.जाती विद्यालय बिजवडी ता.माण यांच्या संयुक्त विद्दमाने श्री सदगुरू गाडगे महाराज यांचा पुण्यतिथि सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.   सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे संचालक शिवाजीराव महानवर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुण्या सौ.शोभा पिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी येळेवाडी-बिजवडी शाळेतील गोरगरीब,अनाथ ,दिनदलित,अनु.जाती च्या मुलांमुलींनी नाटक, नकला,एकपात्री नाटक,गाणी,ग्रुप डान्स सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.दि.20 रोजी सकाळी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जाधव यांची प्रवचनसेवा झाली.दुपारी 12 वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गाडगे बाबांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी डॉ.प्रदीपकुमार पालवे,प्रतिक पिसाळ ,संचालक शिवाजीराव महानवर, सौ.सुरेखा महानवर,मुख्याध्यापक एल.जी.महानवर, डी.एस.दडस,उमेश गोरे,वैभव महानवर,प्रकाश शिंदे ,अधिक्षक,सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.  सूत्रसंचालन कु.स्वाती महा...