Posts

Showing posts from December, 2025

सिद्राममळा जि.प.शाळेत ग्लोबल डे ऑफ जॉय साजरा...!खराडी येथील Multinational कंपनीचे माध्यमातून चर्चासत्र व इतर उपक्रम

Image
बिजवडी - जि प प्राथ शाळा सिद्राममळा येथे Hasbro India Sourcing & operations LLP या खराडी येथील Multinational कंपनीचे माध्यमातून Global Day of Joy मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .  यानिमित्त Hasbro कंपनीचे प्रमुख नीरज सर , राजेंद्र जाधव सर , स्नेहल मॅडम तसेच त्यांचे समवेत कंपनीतील ४० कर्मचारी उपस्थित होते . मुलांसाठी विविध बौद्धिक खेळ , चर्चासत्रे , मार्गदर्शन सत्र , indoor व outdoor games with interesting toys असे विविध प्रकारचे मनोरंजक व ज्ञानवर्धक उपक्रम घेण्यात आले .सर्व विद्यार्थ्यांना लज्जतदार मेजवानी ( भोजन व आईस्क्रीम ) देण्यात आले .  सुमारे १०कि ग्रॅ चा Global Day of Joy केक प्रत्येक वर्गातील एका प्रतिनिधी कडून ( ७ विद्यार्थी ) कापण्यात आला . दुपारी ३ते४या वेळात शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले .विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली .  यानिमित्त Hasbro कंपनीचे वतीने सुमारे ४ लक्ष रु मूल्याची Hasbro playland - पुणे जिल्हयातील प्रथम व एकमेव (Toys Gallery) ...