Posts

Showing posts from March, 2026

बिजवडी येथे दि.23 मार्च रोजी जि.प.केंद्र शाळेचा केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा...!

Image
बिजवडी - सातारा जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती माण व जि.प.केंद्रसमूह बिजवडी यांच्या संयुक्त विद्दमाने बिजवडी ता.माण येथे दि.23 मार्च रोजी सन-2025-26 या शैक्षणिक वर्षाचा बिजवडी जि.प.केंद्रातील केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा आयोजित केल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी लोखंडे यांनी दिली.  या बालआनंद मेळाव्यासाठी जि.प.सद्स्या सौ.अलका जगदाळे सदस्या,माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे,उपसभापती सौ.प्रियांका जगदाळे,पं.स.सदस्या सौ.उषा भोसले ,राजाराम बोराटे ,माणचे गटविकास अधिकारी प्रदिप शेंडगे,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.चंद्रकांत खाडे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे भाग विस्तार अधिकारी विजयकुमार गंबरे,शमिमबानू तांबोळी,केंद्रप्रमुख सौ.साधना झणझणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.   तरी या बालआनंद मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती,पालकवर्ग तसेच ग्रामस्थांनी आपल्या बालचमूंचे विविध कलागुण पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही बिजवडी जि.प.केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व उपशिक्षकांनी केले आहे.

पुण्यात 'कलादर्शन' सोहळ्यात ४० शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना लाभले हक्काचे व्यासपीठ...! टाटा ऑटोकॉम्प लि. पुणे यांच्या CSR उपक्रमांतर्गत आणि उर्मी, योजक व स्ट्रोक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोहळा संपन्न

Image
बिजवडी - पुणे अकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर सभागृहात अलीकडेच 'कलादर्शन' हा विशेष सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. टाटा ऑटोकॉम्प लि. पुणे यांच्या CSR उपक्रमांतर्गत आणि उर्मी, योजक व स्ट्रोक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक नवे आकाश मिळवून दिले.   ​या कार्यक्रमात खेड, चाकण, पिंपरी-चिंचवड (PCMC) आणि हिंजवडी भागातील ३२ जिल्हा परिषद शाळांसह विशेष मुलांसाठी कार्यरत ८ शाळांनी व ऊर्मी संस्थेच्या प्रौढ साक्षरता वर्गातील ७० वर्षाच्या तरूण विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण ४० शाळांच्या सहभागामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. ​कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: ​HoPE कार्यक्रमाचे सादरीकरण: या सोहळ्यात 'होप' (HoPE) उपक्रमांतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध घटकांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. यामध्ये कला, हस्तकला (Craft), संगीत, नृत्य, योगासने आणि 'सेहत' या विषयांवरील प्रात्यक्षिकांचा समावेश होता. ​शिस्त आणि सुरक्षा: सुमारे शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती असूनही, कार्यक्रमाचे नियोजन...