Posts

Showing posts from July, 2021

माण बाजार समितीची निवडणूक होणार रंगतदार..! १८ जागांसाठी विक्रमी १०२ उमेदवारी अर्ज दाखल.!

बिजवडी - माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती दहिवडी ता.माण संचालक मंडळाच्या सन २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १८ जागांसाठी विक्रमी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. माण बाजार समितीचे एकूण २०६५ मतदार १८ संचालक निवडून देणार आहेत.सोसायटी मतदार संघातून ८९५ मतदार ११ संचालक निवडून देणार आहेत. त्यातील सात जागा खुल्या प्रवर्गासाठी, दोन जागा महिलांसाठी, इतर मागास प्रवर्ग साठी एक तर विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी एक जागा आरक्षित आहे. ग्रामपंचायत मतदार संघातून ८३५ मतदार ४ संचालक निवडून देणार आहेत. व्यापारी व आडते मतदार संघातून ३३४ मतदार २ संचालक निवडून देणार आहेत.तर हमाल तोलारी मतदार संघातून एक संचालक निवडून द्यावयाचा असून त्यासाठी फक्त एकच मतदार आहे.  माण तालुक्यातील राजकीय मंडळींनी बाजार समितीची निवडणूक चांगलीच मनावर घेत स्वतंत्र पँनेल टाकले आहेत.त्यामुळे १८ जागासाठी १०२ अर्ज दाखल झालेत.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे भाजपा विरोधात शिवसेना -राष्ट्रवादी - राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष एकत्र येऊन आघाडी करत बाजार समितीची निवडणूक लढवतील...

भाजप नेत्यांच्या व अंध भक्तांच्या करमणूकीसाठी पडळकरांचे माकड चाळे..! - राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रशांत सोनबा विरकर

Image
बिजवडी,ता.१: विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर आ.गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर खालच्या भाषेत टीका करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. यापुढे त्यांनी आपल्या वाणीला विराम द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांना आपल्या भाषेत उत्तर दिले जाईल.भाजप नेत्यांच्या व अंध भक्तांच्या करमणूकीसाठी पडळकरांचे माकड चाळे सुरू असल्याचे ही प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माण खटाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले.  आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असून देखील त्या ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली हे त्यांच्या लायकीला साजेल असे उत्तर जनतेने त्यांना दिलं होतं. तरीदेखील पडळकर भाजप नेत्यांची व अंध भक्तांची करमणूक करण्यासाठी माकड चाळे करत आहेत.आमदार पडळकर हे कुस्तीच्या फडातील बत्ताशा वरील पैलवाना सारखे फडाला रंग आणायचे काम करताना दिसून येत आहेत. यापुढे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना आपली जनमानसातील लायकी आ...