Posts

Showing posts from May, 2025

वडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी...

Image
बिजवडी - वडगाव (दडस वाडा) ता .माण याठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.  यावेळी वडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ.सुंदराबाई महादेव दडस व उपस्थित महिलांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी मुलींनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनप्रवास यावर मनोगते व्यक्त केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली दडस यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.स्वाती दडस यांनी मानले. फोटो - वडगाव ता.माण येथील दडसवाडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी...