दहिवडी रयत शैक्षणिक संकुलातर्फे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 137 वी जयंती उत्साहात संपन्न ...!
बिजवडी - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त दहिवडीतील रयत शैक्षणिक संकुलाच्या चारही शाखांनी विविध उपक्रम साजरे करून आण्णांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. कर्मवीर आण्णांच्या पुतळ्यास अभिवादन करून संपूर्ण दहिवडी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीचे लेझीम पथक यांनी अतिशय मनमोहक असे लेझीम प्रात्यक्षिके करून प्रेक्षकांची मने जिंकली. सर्व मुले पारंपारिक वैशामध्ये आली होती. रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध समाज सुधारक तसेच साधुसंत यांच्या वेशभूषा केलेल्या होत्या तसेच शोभायात्रेचे आकर्षण म्हणजे कर्मवीर आण्णा व रयत माऊली यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी . हे सर्व विद्यार्थी यांची शोभायात्रा संपूर्ण दहिवडी शहरातून जात असताना रयत इंग्लिश मीडियम स्कूल दहिवडीच्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच लेझीम पथकाचे ग्रामस्थांकडून अभिनंदन व कौतुक झाले याप्रसंगी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य आ. सौ. नीलिमाताई पोळ तसेच दहिवडी कॉलेजचे प्राचार्य श्री.साळुंखे साहेब, महात्मा गांधी ...