Posts

Showing posts from May, 2021

माण पंचायत समितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी..!

Image
बिजवडी - माण पंचायत समितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. नूतन सभापती सौ.लतिका विरकर यांनी प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहिली.यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब पवार ,माजी उपसभापती नितीन राजगे , बबनदादा विरकर , गटविकास अधिकारी एस.बी. पाटील , सहाय्यक गटविकास अधिकारी भरत चौगुले , मार्केट कमिटीचे संचालक तानाजी मगर ,आंधळी चे पैलवान संभाजी काळे ,पंचायत समितीतला प्रशासकीय वर्ग उपस्थित होता. फोटो - माण पंचायत समितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजला..!जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार निवडणूक ; मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Image
विशाल गुंजवटे :  बिजवडी - महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या समितीची निवडणूक) नियम २०१७ प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतिम करणेचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. या समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सौ.विजया बाबर यांनी दिली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था. दहिवडी ता.माण व पंचायत समिती, दहिवडी या कार्यालयातील नोटीस बोर्डावरती दि.२५ मे २०२१ रोजी स. ११.०० वाजता प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली आहे.तर  दि.२५ मे २०२१ ते दि.३ जून २०२१ या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत यादीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचे कार्यालयातील जिल्हा निवडणूक कक्षात प्रारूप मतदार यादीवर दावे / हरकती आक्षेप दाखल करण्यात येत...

कोरोनाच्या लढ्यासाठी सर्वतोपरि मदत करणार..! - सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार ; माणच्या आरोग्य केंद्रांना पाच ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर व औषधे भेट

Image
विशाल गुंजवटे बिजवडी - माण तालुक्यात कोरोना बाधित मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाढती संख्या व अपुरी यंत्रसामुग्री यामुळे  आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव मलिकनेर यांच्या साथीने आम्ही विविध कंपन्यांच्या माध्यमातून कोरोनाशी लढा देण्यासाठी व माणवासियांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणेला मदत करत आहोत.कोरोनाच्या या लढ्यात माणवासियांना सर्वतोपरि मदत करणार असल्याचेही प्रतिपादन माणचे सुपुत्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी व नुकतीच सचिव संवर्ग पदावर पदोन्नती झालेले अविनाश सुभेदार साहेब यांनी केले.  दहिवडी ता.माण येथील पंचायत समितीच्या सभागृहात विविध कंपन्यांच्या माध्यमातून व अविनाश सुभेदार व पोपट मलिकनेर यांच्या प्रयत्नांतून माण तालुक्यात पाच आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व रोग प्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव मलिकनेर ,अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेश जाधव,सभापती तानाजीराव कट्टे ,डॉ संदीप ...

सातारा , कोरेगाव एमआयडीसी साठी भरीव निधी..!- सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार ; सातारासाठी अग्निशमन केंद्रासाठी १५ कोटी तर कोरेगावसाठी६० लाखांच्यावर अंतर्गत रस्त्यासाठी निधी

Image
बिजवडी - महाराष्ट्र विकास औद्योगिक कॉर्पोरेशन अंतर्गत सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्राच्या बांधकाम तसेच त्यातंर्गत विविध कामांसाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रूपये तर कोरेगाव (मिनी) औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यासाठी ६० लाख ९७ हजार रूपयांची मुख्य कार्यकारी अधिकारी एमआयडीसी कडून प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती एमआयडीसीचे सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली.  सहमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले ,सातारा जिल्ह्यात अग्निशमन केंद्राची नितांत गरज होती.तीच गरज ओळखून आमच्या विभागाचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई ,एमआयडीसीचे मुख्यकार्यकारी अधिकारी अनबलगन यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्र व कोरेगाव औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसाठी आम्ही प्रयत्नशील होतो.या प्रयत्नांना यश आले असून सातारच्या केंद्रासाठी १४ कोटी ९१ लाख १३ हजार ३०० रूपयांची प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.या केंद्रातंर्गत अग्निशमन वाहने ,इमारत बांधकाम ,कर्मचाऱ्यांसाठी घरे आदी सोयीसुविधा राबवल्या जाणार आहेत. आपत्कालीन प्रसंगावेळी या ...

विठू - माऊलीचा भक्त : गणपत महानवर (बापू)

Image
आज दि .3/5/2021 रोजी  स्व. कै. गणपत म्हलारी महानवर(बापू)यांचे प्रथम पुण्यसमरण यानिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण मी अनुभवलेले बापू.... - दादासो दडस ,मुख्याध्यापक श्री संत गाडगे महाराज प्राथमिक अनु.जाती विद्यालय बिजवडी ता.माण जि.सातारा बापूंची आणि माझी पहिली ओळख 25 जून 2000 रोजी झाली. मी पहिल्यांदा त्यांच्या घरी आमचे मार्गदर्शक लक्ष्मण सरांबरोबर गेलो. त्यावेळी ओळख झाली पहिल्याच ओळखीत बापूंनी मला आपलेशे केले .बापूंचा स्वभाव अगदी गरीब,मायाळू वाटला ते नेहमी विचारपूस करत घरच्यांना पाहुणचार करण्यास लावत. कोणी जरी घरी गेले तरी चहापान व जेवण केल्याशिवाय ते माघारी जाऊन देत नसत.नेहमी समोर कोणतीही व्यक्ती आली की रामराम करणे हा त्यांचा आदरातिथ्य स्वभाव होता . बापुंजवळ बसल्यानंतर नेहमी दोन चार अध्यात्मातल्या गोष्टी ऐकायला बरे वाटायचे ते कधी कोणालाही कधी वाईट,निंदनिय असे कधी बोलले असे मी वीस वर्षाच्या अनुभवात कधी ऐकले नाही.त्यांना आध्यात्माची फार आवड. विठू - माऊली म्हणजे त्यांचे जीव की प्राण.न चुकता वारीला जाणाऱ्या बापूंना भजन ,प्रवचनाची फार आवड.साधी सरळ मार्गी माणूस, कष्टाला मह...