आमदार साहेब....राष्ट्रवादीच्या भूलथापांना बळी पडू नका...!शेखरभाऊंना मदत नाही करता आली तर तटस्थाची भूमिका स्विकारावी...!- राजेंद्र जाधव ;
बिजवडी - जि.बँकेच्या निवडणूकीतून आमदार जयकुमार गोरे साहेबांनी अनपेक्षितपणे माघार घेत आपली भूमिका अजूनही अस्पष्ट ठेवली आहे. मात्र चालू घडामोडीवरून असे दिसून येते की आमदार साहेब राष्ट्रवादीला मदत करण्याच्या विचारात दिसून येतायत.मात्र आमदार साहेब... राष्ट्रवादीसाठी एवढ काही करून आमच्या नेत्यांनी शेखरभाऊंनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याऐवजी त्यांच्या विरोधात स्व.तात्यांच्याच मुलाला उभ केलेय. राष्ट्रवादी किती फसवी अन वेळ मारून नेणारी आहे ते तुम्हालाही चांगलच माहित आहे.त्यामुळे आमदार साहेब ....राष्ट्रवादी अन त्यांच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.एकवेळ आमच्या नेत्याला मदत केली तर छानच पण नाही केली तरी चालेल पण या निवडणूकीत आपण तटस्थ राहत राष्ट्रवादीलाही मदत करू नये असे भावनिक आवाहन व विनंती शिवसेनेचे नेते , शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे. राजेंद्र जाधव म्हणाले ,स्व.पोळतात्यांना जि.बँकेत निवडून आणण्यासाठी तुमच्याविरोधात आमच्या नेत्यांनी तनमनधनाने किती प्रयत्न केले ते तुम्हालाही माहित आहे.प्रसंगी तुम्हा दोघांवरही अन...