Posts

Showing posts from January, 2022

बिजवडी जि.बँक शाखेचे पिंटूशेठ जगदाळेंच्या हस्ते ध्वजारोहण...!

Image
बिजवडी - सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांचे खंदे समर्थक व उत्तर माणचे युवानेते पिंटूशेठ जगदाळे यांच्या हस्ते सातारा जि.म.बँक बिजवडी या शाखेचे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.  त्याप्रसंगी सरपंच आप्पासो अडागळे , युवानेते संदीप भोसले ,माजी प्राचार्य हणमंतराव भोसले ,तात्याबा गाढवे ,दादासो भोसले , ज्ञानदेव गाढवे ,आप्पासो बाबर ,शाखाधिकारी घाडगे साहेब , इतर उपस्थित ग्रामस्थ व बँकेचे अधिकारी ,सेवक वर्ग उपस्थित होते. * बिजवडी त ध्वजारोहण संपन्न*...... बिजवडी ता.माण येथील ग्रामपंचायत ,विकास सेवा सोसायटी ,कर्मवीर विद्यालय ,जि.प.शाळा , अंगणवाडी ,संत गाडगे महाराज विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सरपंच आप्पासो अडागळे ,ग्रामपंचायत सदस्य ,विकास सेवा सोसायटी चे चेअरमन ,पदाधिकारी ,ग्रामस्थ , मुख्याध्यापक ,शिक्षक ,कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते. फोटो - बिजवडी ता.माण येथील जि.बँकेचे ध्वजारोहण करताना उत्तर माणचे युवानेते पिंटूशेठ जगदाळे व उपस्थित संदीप भोसले , ग्रामस्थ व अधिकारी, सेवक वर्ग...

*चैतन्य अकँडमीच्या वर्धापनदिनानिमित्त दि.७ रोजी विविध कार्यक्रम*..!

Image
बिजवडी - दहिवडी ता.माण येथे चैतन्य करियर अकँडमीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.७ जानेवारी २०२२ रोजी विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संदीप खाडे सर यांनी दिली.  वर्धापनदिनानिमित्त चैतन्य अकँडमीतर्फे भव्य रक्तदान ,आरोग्य तपासणी शिबीर , चैतन्य पुरस्कार २०२२ वितरण सोहळा , यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभ , पञकार दिनानिमित्त पञकार बंधुचा सत्कार ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यान असे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत.या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहनही चैतन्य करीयर अकँडमीच्या वतीने करण्यात आले आहे.