भाजप नेत्यांच्या व अंध भक्तांच्या करमणूकीसाठी पडळकरांचे माकड चाळे..! - राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रशांत सोनबा विरकर


बिजवडी,ता.१: विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर आ.गोपीचंद पडळकर यांनी पवार घराण्यावर खालच्या भाषेत टीका करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. यापुढे त्यांनी आपल्या वाणीला विराम द्यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस त्यांना आपल्या भाषेत उत्तर दिले जाईल.भाजप नेत्यांच्या व अंध भक्तांच्या करमणूकीसाठी पडळकरांचे माकड चाळे सुरू असल्याचे ही प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माण खटाव विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत विरकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले. 
आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपच्या निवडणूक चिन्हावर बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजपा या राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार असून देखील त्या ठिकाणी त्यांची अनामत रक्कम जप्त झाली हे त्यांच्या लायकीला साजेल असे उत्तर जनतेने त्यांना दिलं होतं. तरीदेखील पडळकर भाजप नेत्यांची व अंध भक्तांची करमणूक करण्यासाठी माकड चाळे करत आहेत.आमदार पडळकर हे कुस्तीच्या फडातील बत्ताशा वरील पैलवाना सारखे फडाला रंग आणायचे काम करताना दिसून येत आहेत. यापुढे त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका करताना आपली जनमानसातील लायकी आठवणीत ठेवून टीका करावी अन्यथा त्यांना जशास तसे उत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून देण्यात येईल. सोलापूर येथे आमदार पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या व आदरणीय पवारसाहेबांवर प्रेम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.त्यामुळे यापुढे पडळकर यांनी शब्द जपून वापरावेत. पडळकरांनी पवारसाहेबांवर बोलण्यापेक्षा केंद्रशासनाच्या आखत्यारित  येणाऱ्या धनगर आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण यासाठी आपल्या नेत्यांवर दबाव आणावा असाही मौलिक सल्लाही प्रशांत विरकर यांनी दिला आहे.

फोटो - प्रशांत विरकर

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!