अयोध्येतील सोहळ्यासाठी अक्षयमहाराज भोसले यांना विशेष निमंत्रण

बिजवडी:अयोध्येत पार पडणाऱ्या ऐतिहासिक भगवान श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण माण तालुक्यातील संत साहित्य अभ्यासक कीर्तनकार अक्षयमहाराज भोसले यांना मिळाले असून ते या भव्यदिव्य कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत.
  या सोहळ्यास शंकराचार्य,धर्मपिठांचे आचार्य, महामंडलेश्वर,राष्ट्रसंत यांना आमंत्रित करण्यात आले आहे.आपल्या आध्यात्मिक कार्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संदेश देण्याचे काम अक्षयमहाराज भोसले यांनी केल आहे. दुष्काळग्रस्त भागातील त्यांची कीर्तन मालिका हा लोकांचा जिव्हाळ्याचा विषय होता.नानाविध वृत्तपत्रे ,मासिके या माध्यमातून त्यांचे लिखाण नियमित प्रसिद्ध होत असते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यातील अध्यात्मिक क्षेत्रातील  ते महत्त्वाचा दुवा मानला जातात.आपल्या घरातून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी ५००० पेक्षा अधिक ग्रंथ व साहित्य ग्रंथालयाची सुरुवात केली.अनेको विद्यार्थी त्या माध्यमातून अभ्यास करत आहेत.
 महाराष्ट्रभर नव्हे तर देशामध्ये वारकरी संप्रदाय युवा मंचच्या माध्यमातून संत साहित्य घराघरात पोहोचवण्यासाठी सन २००९ पासून ते सक्रिय आहेत  व लाखो युवकांचे एकीकरण त्यांनी केले आहे.परदेशात देखील त्यांचे अनेको धर्मशिक्षणाचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने चालतात.संपूर्ण विश्वाचे ज्या सोहळ्याकडे लक्ष आहे त्यास आपल्या गावातील सुपुत्राला प्रभू रामचंद्रांच्या आयोध्याचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण  आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
 मागील २५ दिवसांपासून ते भक्ती शक्ती संवाद यात्रेअंतर्गत राज्यभर प्रवासात आहेत व त्यांच्या यात्रेमुळे अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक समस्यांना न्याय मिळाला आहे.

फोटो - ह.भ.प.अक्षय महाराज भोसले

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!