ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगली इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा...! विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ; पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्कूलच्या सर्वेसर्वा सौ.हर्षदा देशमुख-जाधव यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम संपन्न

बिजवडी - गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी हा उत्सव म्हणजे एक नवीन इव्हेंटच बनवून ठेवला आहे.या गोष्टीमुळे सगळीकडे उत्सव कमी आणि दिखावूपणा जास्त होत आहे. यामुळे लोक पर्यावरणाचा विचार करत नाहीत.पण जर प्रत्येकाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला तर थोड्या प्रमाणात का होईना आपण प्रदूषण टाळू शकतो.यासाठी वडूजच्या ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या सर्वेसर्वा सौ.हर्षदा देशमुख -जाधव यांच्या संकल्पनेतून व प्राचार्या मृदुला बँनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली गणपती बनवण्याची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
 त्रीनिटी स्कूलमध्ये दै.सकाळ आयोजित कार्यशाळेत इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व मुलं मुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.यावेळी त्यांना पर्यावरणाचे संरक्षण व्हावं यासाठी इको फ्रेंडली गणपती बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे गणपती बनवले यासाठी शाळेचे कलाशिक्षक तेजस माने यांनी मेहनत घेतली.यावेळी प्राचार्य मृदुला बॅनर्जी, व्यवस्थापक महेश ममदापुरे,सुरज भोसले,तसेच सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी बाप्पांची मुर्ती बनवत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसोबत आनंदात दिवस घालवला.
 यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्या मृदुला बँनर्जी म्हणाल्या,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रीम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपारिक शाडूच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्तीचा वापर, तसेच सजावटीसाठी थर्माकोल चा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होताना आपल्याला पहायला मिळते.हजारोंच्या वर गणेशमूर्ती पाण्यात न विरघळल्यामुळे त्या पाण्यावर तरंगत असतात. हे बघून खऱ्या गणेशभक्ताचे मन विषण्ण झाल्यावाचून राहत नाही.त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास व गणेशमूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडूमातीच्या गणेशमूर्तीचा वापर करायला हवा. मातीच्या बनवलेल्या मूर्ती पर्यावरणाला हानी पोहचवत नाही आणि इको फ्रेंडली मूर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळतात.तसेच इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यासाठी वापरणारे रंग हे कच्चे व प्राकृतिक असतात. यामुळे कुठलीही हानी पोहचत नाही.
तुम्ही शाडूची मूर्ती घरीच विसर्जित करू शकता. त्यानंतर त्या विरघळलेल्या मातीचा तुम्ही उपयोग देखील करू शकतात. या सर्व गोष्टी केल्यामुळे बाप्पाच्या मूर्ती ची विटंबना टळेल व पर्यावरण पण सुरक्षित राहणार आहे.समाजपयोगी असे विविध उपक्रम राबवत या स्कूलमध्ये सामाजिक बांधीलकी जपण्याचे कार्य या केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
फोटो - वडूज येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्यशाळेत इको फ्रेंडली गणपती बनवताना विद्यार्थी.....

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!