उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे यांची सामाजिक बांधीलकी..! मळे (पुणे) येथील जि.प.शाळेला शैक्षणिक डिजीटल साहित्याचे वितरण
बिजवडी,ता.13: पुणे येथील उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे (SAKA Engineering systems Pvt Ltd , Pune) यांचे आर्थिक सहयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मळे ,ता.भोर जि.पुणे येथे Empower to Education प्रकल्पांतर्गत शालेय विद्यार्थ्यासाठी Interactive Digital Panel with Balbharti software बसवण्यात आले आहे.उर्मी संस्थेच्या माध्यमातून साका इंजिनीयरिंग सिस्टीम प्रा.लि.पुणे यांनी जि.प.शाळेला शैक्षणिक डिजीटल साहित्याचे वितरण करून सामाजिक बांधीलकी जपली आहे.
ग्रामीण व अतिदूर्गम भागातील विद्यार्थ्याना शिक्षणाच्या नवनवीन वाटा आत्मसात करता याव्यात, आधुनिक शिक्षणाची दालनं त्यांच्यासाठी खुली व्हावीत या उद्देशाने या शाळेला डिजीटल साहित्य देण्यात आले आहे.या पॅनलचे उदघाटन व शालार्पण समारंभ शुक्रवार दि ११-४- २०२५ रोजी संपन्न झाला .या कार्यक्रमासाठी भोर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे साहेब ,उर्मी संस्थेचे अध्यक्ष राहुल शेंडे साहेब,अनिता कापरे मॅडम,सायली फडके मॅडम, Sakaकंपनीच्या वतीने सारीका थिगळे मॅडम व त्यांचे सहकारी तसेच केंद्रप्रमुख पोपट तांगडे,मळे गावचे सरपंच हनुमंत ढेबे ,जेष्ठ नेते काळुराम मळेकर , ग्रामविकास अधिकारी ढवळे ,सुधाकर गिऱ्हे सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष , पालक व शिक्षकवृंद ,शिक्षक संघटनेचे हिरगुडे सर , तायडे सर उपस्थित होते .
मान्यवरांचे हस्ते उद्घाटन संपन्न झाल्यानंतर इ ५वी मधील कु सानिका मळेकर या विद्यार्थीनीने Interactive Panel सुरू करून त्याद्वारे अभ्यासक्रम आशय अध्ययन, विविध प्रकारे फलक लेखन , संगणकीय वापर व फोनद्वारे अध्ययन इ प्रकारे होणारा बोर्डचा वापर सप्रात्यक्षिक सादर करून दाखवला.
प्रास्ताविकात वैभव पोरे यांनी या डिजिटल माध्यमाची शाळेसाठी असणारी गरज व महत्व विषद केले.तसेच या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिकणे कशा प्रकारे सुलभ होणार आहे हे सांगत असताना शाळेतील सर्व विद्यार्थी नव्या माध्यमातून आनंददायी शिक्षण घेतील व त्यांची संपादणूक निश्चितच वाढेल असा विश्वास व्यक्त केला . शाळेतील सर्व विद्यार्थी स्वतः याचा वापर करत तंत्रस्नेही होत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला .
ऊर्मी संस्थेच्या अनिता मॅडम यांनी शाळेच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी Saka कंपनीचे सहयोगातून वैभव पोरे यांचे माध्यमातून मळे शाळेसाठी भविष्यात देखील भरीव कार्य करणार असलेबाबत सांगून जून महिन्यात शाळेच्या परिसरात ५० झाडे लावण्याचा मनोदय व्यक्त केला .
Saka कंपनीचे वतीने सायली फडके मॅडम यांनी ही सुविधा शाळेला प्रदान करत असताना एका अत्यंत दुर्गम भागातील गरजू शाळेतील मुलांना याचा लाभ होणार असलेबाबत समाधान व्यक्त केले तसेच भविष्यातही कंपनीचे वतीने वृक्षारोपण, शालेय शौचालय इ कामे करण्याबाबत सकारात्मक असलेचे सांगितले .
गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे साहेब यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करतानाच शालेय विद्यार्थी हे वक्तृत्व कलेत पारंगत असावेत तसेच कला , क्रिडा व कार्यानुभव या विषयांकडेही शिक्षकांनी विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली .या डिजिटल माध्यमाचा चांगला वापर करून शालेय दर्जा निश्चीतच उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मळे शाळेसाठी व भोर तालुक्यातील व पुणे जिल्हयातील शाळांसाठी विविध माध्यमातून सुविधा पुरवणेसाठी श्री वैभव पोरे हे सतत प्रयत्न करत असलेबाबत विशेष कौतुक केले .
आभार व्यक्त करताना सरपंच हनुमंत ढेबे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहाणार असलेचे सांगून शिक्षकांचे मदतीने, ग्रामपंचायत कडून व प्रसंगी वैयक्तीक ही मदत करून शाळेची भौतिक व बौद्धिक उन्नती साध्य करणार असलेचे सांगितले.
चौकट - याच कार्यकमात वाढाणे केंद्रातील सर्व शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी उर्मी संस्थेमार्फत उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी दर्जेदार सनकॅपचे वाटप करण्यात आले. तसेच भूमी संस्था व BNY Mellon या International कंपनीचे आर्थिक सहयोगातून मळे शाळेत ३ते ५ कि मी अंतर पायी चालत येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी १० सायकलचे वाटप करणार असलेबाबत वैभव पोरे यांनी सांगितले व बहुमूल्य सहकार्याबद्दल उर्मी संस्था व Sakaकंपनी यांचे आभार मानले .
फोटो - मळे जि.पुणे येेथील जि.प.शाळा डिजीटल करण्यात आली त्याप्रसंगी...
Comments
Post a Comment