वडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी...
बिजवडी - वडगाव (दडस वाडा) ता .माण याठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी वडगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच सौ.सुंदराबाई महादेव दडस व उपस्थित महिलांच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात आले.याप्रसंगी मुलींनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनप्रवास यावर मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वैशाली दडस यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ.स्वाती दडस यांनी मानले.
फोटो - वडगाव ता.माण येथील दडसवाडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगी...
Comments
Post a Comment