शिवाजीराव महानवर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित...!

बिजवडी,ता.12:श्री गाडगे महाराज मिशनचे संचालक,येळेवाडी-बिजवडी शैक्षणिक संकुलाचे प्रमुख शिवाजीराव महानवर सर यांना डीएसपी न्यूज चँनेलकडून राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
  शिवाजीराव महानवर हे समाजातील निराधार, निराश्रीत दुर्बल,गोर गरीब व शिक्षणापासून वंचीत असणाऱ्या मुला- मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत.येळेवाडी सारख्या दुर्गम व दळणवळणापासून वंचीत असलेल्या या खेडेगांवामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमाती मुला-मुलींसाठी श्री गाडगे महाराज मिशन, मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आश्रमशाळेची स्थापना केली.तसेच समाजातील अनु. जातीच्या मुला मुलींच्या सर्वांगिण विकासासाठी व मोफत शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने श्री संत गाडगे महाराज केंद्रीय अनु.जाती निवासी प्राथमिक / माध्यमिक विद्यालय,बिजवडी या विद्यालयाची स्थापना करून शेकडो मुलांमुलींना ते ज्ञानदान देत आहेत.
 शिवाजीराव महानवर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असून त्याबद्दल त्यांचे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे,दत्तात्रय फाळके, तसेच विविध मान्यवर अभीनंदन केले आहे.
 

फोटो - वडूज ता.खटाव येथे पुरस्कार स्विकारताना शिवाजीराव महानवर,याप्रसंगी डी जे छकुली वैभवी कांबळे व इतर उपस्थित..

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!