बिजवडी येथे दि.23 मार्च रोजी जि.प.केंद्र शाळेचा केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा...!
बिजवडी - सातारा जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती माण व जि.प.केंद्रसमूह बिजवडी यांच्या संयुक्त विद्दमाने बिजवडी ता.माण येथे दि.23 मार्च रोजी सन-2025-26 या शैक्षणिक वर्षाचा बिजवडी जि.प.केंद्रातील केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा आयोजित केल्याची माहिती केंद्र संचालक धनाजी लोखंडे यांनी दिली.
या बालआनंद मेळाव्यासाठी जि.प.सद्स्या सौ.अलका जगदाळे सदस्या,माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे,उपसभापती सौ.प्रियांका जगदाळे,पं.स.सदस्या सौ.उषा भोसले
,राजाराम बोराटे ,माणचे गटविकास अधिकारी प्रदिप शेंडगे,सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ.चंद्रकांत खाडे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे
भाग विस्तार अधिकारी विजयकुमार गंबरे,शमिमबानू तांबोळी,केंद्रप्रमुख सौ.साधना झणझणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या बालआनंद मेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती,पालकवर्ग तसेच ग्रामस्थांनी आपल्या बालचमूंचे विविध कलागुण पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहनही बिजवडी जि.प.केंद्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व उपशिक्षकांनी केले आहे.
Comments
Post a Comment