कोळकीतील दुर्वांकुर व विसावा हॉटेलमधील कामगार घालतायत सोसायटीत धिंगाणा...! रहिवाशांचा संताप वाढला ; परराज्यातील व्यसनी कामगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी ; नागरीक त्रस्त

विशाल गुंजवटे : 

बिजवडी - कोळकी ता.फलटण येथील नामांकित दुर्वांकुर व विसावा हॉटेलमध्ये काम करत असलेल्या परराज्यातील कामगारांच्या असभ्य वर्तणुकीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.व्यसनाधीन कामगारांकडून रात्रीअपरात्री दंगा,आरडाओरडा,तसेच सार्वजनिक शिस्त भंग होत आहे.अशा व्यसनी कामगारां विरोधात रहिवाशी आक्रमक झाले असून या प्रकरणाकडे स्थानिक व पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
 कोळकी ता.फलटण येथील साईनंद सोसायटीमध्ये बहुतांश सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास असून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेली आहेत.मात्र सोसायटीतील काही फ्लॅटमध्ये हॉटेलमधील कामगार समूहाने राहत आहेत.रात्रीअपरात्री रूमवर येताना ते व्यसनी कामगार धिंगाणा घालत असतात.संबंधित कामगारांकडून गांजा, धूम्रपान व मद्यपान यांसारख्या व्यसनांचा खुलेआम वापर होत असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकाराबाबत हॉटेल मालकांना अनेक वेळा सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे.उलट कामगारांची बाजू घेत अरेरावीची भाषा वापरली जाते.त्यामुळे संतप्त रहिवाशांनी आता या प्रकरणी पोलीसांत तक्रार करण्याचा इशारा दिला आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर त्यांनी हॉटेलमालकांना सद्य परिस्थिती सांगत वारंवार सूचना दिल्या आहेत.यावर तोडगा न निघाल्यास कठोर पावले उचलण्याची मानसिकता रहिवाशांची असून स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणीही रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

चौकट - व्यसनी कामगार देतायत ग्राहकांना सेवा.....
   कोळकीतील नावाजलेल्या या दुर्वांकुर व विसावा हॉटेलमधील कामगार व्यसनी असून ग्राहकांना कशी वागणूक देत असतील..? गांजा, दारू, गुटखा, धुम्रपान करणारे कामगार कसे जेवण बनवत असतील...? ग्राहकांना सेवा देताना त्यांच्या व्यसनाधीनतेमुळे ती सेवा कशी असेल...?याबाबत साशंकता व्यक्त केली जात असून ग्राहकांनी असे कामगार ज्याठिकाणी असतील तिथे कुटुंबासमवेत जेवायला जाणे योग्य आहे का..? याचाही विचार करणे गरजेचे आहे.कारण या ठिकाणी व्यसनी कामगार ग्राहकांना सेवा देत आहेत.

चौकट : रहिवाशांची भूमिका.....
“सोसायटीमध्ये कुटुंबीय वातावरण असताना काही फ्लॅटमध्ये हॉटेल कामगार मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यांच्या राहण्याला आमचा विरोध नाही; मात्र व्यसनाधीन व बेशिस्त वागणुकीमुळे नागरिकांना होणारा त्रास असह्य झाला आहे. हा त्रास कमी व्हावा, एवढीच आमची अपेक्षा आहे.”

चौकट -  प्रमुख समस्या.....
 गांजा, धूम्रपान व मद्यपानाचे प्रकार
रात्री उशिरापर्यंत दंगा व गोंधळ
महिलांमध्ये व मुलांमध्ये भीतीचे वातावरण
हॉटेल मालकांकडून दुर्लक्ष व अरेरावी


चौकट - सोसायटी ला संबंधित हॉटेलमालकांनी मागितलीय 15 दिवसांची मुदत....
कामगारांच्या तक्रारी सोसायटीच्या माध्यमातून संबंधित हॉटेलमालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली असून ते या व्यसनी कामगारांचा बंदोबस्त करताय की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

फोटो - 

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!