आमदार साहेब....राष्ट्रवादीच्या भूलथापांना बळी पडू नका...!शेखरभाऊंना मदत नाही करता आली तर तटस्थाची भूमिका स्विकारावी...!- राजेंद्र जाधव ;
बिजवडी - जि.बँकेच्या निवडणूकीतून आमदार जयकुमार गोरे साहेबांनी अनपेक्षितपणे माघार घेत आपली भूमिका अजूनही अस्पष्ट ठेवली आहे. मात्र चालू घडामोडीवरून असे दिसून येते की आमदार साहेब राष्ट्रवादीला मदत करण्याच्या विचारात दिसून येतायत.मात्र आमदार साहेब... राष्ट्रवादीसाठी एवढ काही करून आमच्या नेत्यांनी शेखरभाऊंनी केलेल्या मदतीची परतफेड करण्याऐवजी त्यांच्या विरोधात स्व.तात्यांच्याच मुलाला उभ केलेय. राष्ट्रवादी किती फसवी अन वेळ मारून नेणारी आहे ते तुम्हालाही चांगलच माहित आहे.त्यामुळे आमदार साहेब ....राष्ट्रवादी अन त्यांच्या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका.एकवेळ आमच्या नेत्याला मदत केली तर छानच पण नाही केली तरी चालेल पण या निवडणूकीत आपण तटस्थ राहत राष्ट्रवादीलाही मदत करू नये असे भावनिक आवाहन व विनंती शिवसेनेचे नेते , शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे.
राजेंद्र जाधव म्हणाले ,स्व.पोळतात्यांना जि.बँकेत निवडून आणण्यासाठी तुमच्याविरोधात आमच्या नेत्यांनी तनमनधनाने किती प्रयत्न केले ते तुम्हालाही माहित आहे.प्रसंगी तुम्हा दोघांवरही अनेक केसेस दाखल झाल्या. याची झळ तुमच्या दोघांच्या घरातल्या व्यक्तींपासून कार्यकर्त्यांपर्यत पोहचली. अजूनही या केसेस चालूच आहेत.
त्यानंतर मेलेल्या राष्ट्रवादीला जिवंत करून गतवैभव प्राप्त करून दिले.एखाद्या चांगल्या माणसाचा काटा कसा काढायचा व त्याची कशी जिरवायची ते राष्ट्रवादीला व त्यांच्या नेतेमेडंळींना चांगले ठाऊक आहे. सर्वसत्ता स्थाने मिळवत माण मतदारसंघात राष्ट्रवादीला चांगले दिवस आणून दाखवल्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणूकीला स्व.पतंगराव कदम साहेबांच्या बंधूविरोधात कोणी उभे राहण्यास तयार नसताना आमच्या नेत्यांना बळी बनवत उमेदवारी करायला लावली.राष्ट्रवादीकडे जिंकण्यापेक्षा जास्त मते असताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होतो.तो कसा झाला हे सर्वांना माहित आहे.या निवडणूकीत आमच्या नेत्यांकडून आर्थिक समाधान करून घेऊनही राष्ट्रवादीच्या लोकांनी मते दिली नाहीत.आमच्या नेत्याची राजकीय घौडदौड थांबवण्यासाठी व त्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठीच राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन पाडले.तरीही याचा विचार न करता पुन्हा सर्व विसरून जि.प.पं.स निवडणूकात राष्ट्रवादीला यश मिळवून दिले.तात्यांच्या दोन्ही सुनांना उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्यात मोलाची भूमिका निभावलेल्या आमच्या नेत्याच्या विरोधात आज तेच उभे राहिलेत.पण तात्यांना केलेल्या मदतीचा मुलाला विसर पडला आहे.
एवढे करूनही जी राष्ट्रवादी सहजपणे सर्व विसरून जाऊन विरोधात उभी राहते.अशा फसव्या राष्ट्रवादीच्या भूलथापांना आमदार साहेब तुम्ही बळी पडू नये असे आम्हाला वाटते.
आम्हाला मान्य आहे आम्ही कायम तुमच्या विरोधात उभे असतो.कोण जिंकतो कोण हरतो तो जय पराजयाचा भाग आहे.या निवडणूकीत आपण माघारी घेतलीय.आमची एकच विनंती आहे की, आपण या निवडणुकीत मदत नाही करू शकला तरी निदान विरोधकांना फायदा होईल अशीही आपली भूमिका नसावी.जेणेकरून भविष्यात हीच राष्ट्रवादी शेफारून जावून नेहमीप्रमाणेच दोघांच्याच डोक्यावर बसू नये.यासाठी आपण योग्य तो निर्णय घ्यावा असे आवाहन ही राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
चौकट - आमदार साहेब...आपण यावेळी जि.बँक निवडणूकीतून माघार घेतली. यात आपली निश्चितच काहीतरी राजकीय खेळी असेल.परंतू हीच राजकीय खेळी दोघांचेही कायम राजकीय नुकसान पाहणाऱ्या राष्ट्रवादीच्या फायद्याची नसावी.आपलीही ताकद मोठी आहे.आपली ताकद आमच्या नेत्याच्या पाठीशी उभी राहीली तर शेखरभाऊ बँकेत जातील.अन जर तुमची मानसिकता आमच्या नेत्याला मदतीची नसेलच तर निदान या निवडणूकीत आपण तटस्थ राहावे पण राष्ट्रवादीला मदत करू नये.अशी विनंतीही आम्ही करत आहोत.
चौकट - आमदार साहेब ....तुम्ही एकदातरी आम्हाला मदत केलीय का हो...तरीही ही राष्ट्रवादी गोरेबंधू एकच असल्याचे कायम बोंबलतेय...
आमदार साहेब ...आमच्या नेत्यांची व आपली राजकीय दुष्मणी सर्वज्ञात आहे.
प्रत्येकजण आपल्या ताकदीवर विजय मिळवतो.आमच्या नेत्यांनी कधी तुम्हाला व तुम्ही कधी आमच्या नेत्याला मदत केली आहे का हो...तरीही ही राष्ट्रवादी गोरेबंधू एकच आहेत.असे कायम बोंबलताना दिसून येतेय.उलट पंचायत समितीत आमचा सभापती असताना त्याच्याविरोधात तुमच्या सदस्यांना बरोबर
घेऊन राष्ट्रवादीने अविश्वास आणलाय. अन तुमच्या दोघांच्या नावाने बोंबलत लोकांच्यात अपप्रचार करत आहे. दोघांचेही वाईट पाहणाऱ्या राष्ट्रवादीला
धडा शिकवण्यासाठी आपण आम्हाला मदत करावी.
चौकट - जि.बँकेत गोरे बंधूना रोखण्याचा राष्ट्रवादीचा मास्टर प्लँन...!
आमदार साहेब तुम्ही जि.बँकेत प्रवेश केल्या नंतर राष्ट्रवादीसाठी तुम्ही डोकेदुखी बनून राहीला होता.त्यामुळे तुम्हाला बँकेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने किती चाली खेळल्या हे सर्वज्ञात आहे.आताही तुम्हाला खोटी आश्वासने देऊन तुमच्या फक्त मताचा वापर करून घेतील.तुम्हाला तर बाजूला ठेवण्यात त्यांना यश आलेय.आता आमच्या नेत्यांना बँकेत येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न चाललेत.दोन्ही गोरे बंधूना बँकेपासून दूर ठेवण्याचा मास्टरप्लँन राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादी कधीच कोणता दिलेला शब्द पाळत नाही.त्यामुळे तुम्ही त्यांच्या भूलथापांना बळी न पडू नये.
चौकट -आमदार साहेब....रामराजेंना तुम्हीच चांगले ओळखू शकता तरीही....
आमदार साहेब ....रामराजे घाट चढून आल्यावर तुमच्याविरोधात कसे बोलतात ते सर्वांना माहित आहे.त्यांच्या राजकीय खेळ्या तुम्ही चांगल्याच ओळखून आहात.स्वार्थापोटी ते काहीही करायला व कोणताही राजकीय तह करायला बसलेत.परंतू अजून ही तुम्ही धूर्त रामराजेंपासून सावध रहा.गोड बोलून एखाद्याचा काटा कसा काढायचा त्यात ते पारंगत आहेत. तुम्हीही राजकारणाच्या तालमीत चांगलेच मुरलेले आहात.काय करावे काय करू नये हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने सांगणे बरे नव्हे तरीही आपण सावध भूमिका घेत निर्णय घ्यावा..
फोटो - आमदार जयकुमार गोरे ,शेखर गोरे
Comments
Post a Comment