ग्रामसेवकाला अपशब्द वापरल्याबद्दल आमदारांचा ग्रामसेवक संघटनेतर्फे निषेध..!सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निवेदन
बिजवडी - आमदार संजय शिरसाठ,औरंगाबाद पश्चिम यांनी ग्रामसेवकांबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल या घटनेचा जाहीर
निषेध करत संबधितावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याची मागणी सातारा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने
मा. जिल्हाधिकारी ,मा. मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद सातारा माननीय पोलीस प्रमुख सातारा यांना निवेदने देऊन करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की ,आमदार संजय शिरसाठ ( औरंगाबाद पश्चिम) यांनी आपला तोल सोडून भाषण
केले. ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्य भाषा वापरून, शिवीगाळी केली.ग्रामसेवक भामटे आहेत. महिला सरपंचांची फसवणूक करतात.हरामखोर शब्द वापरलेला आहे या वक्तव्यामुळे राज्यातील २२ हजार ग्रामसेवकांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत. लोकप्रतिनिधी असे वक्तव्य कसे करू शकतात. यांना भानावर आणणे गरजेचे आहे.राज्यभर ग्रामसेवक अत्यंत
प्रतिकुल परिस्थितीत प्रामाणिकपणे कामकाज करीत आहेत.संजय शिरसाठ यांनी जाहीर माफी मागावी.आपले म्हणणे मागे घ्यावे.समाजात ग्रामसेवकांबद्दल चुकीचा समज गेला आहे. कृपया ग्रामसेवक संवर्ग खुप तणावाखाली आलेला आहे.प्रचंड मानहानी झालेली आहे.सरपंच आणि ग्रामसेवकांमध्ये तेढ निर्माण झालेली असुन अविश्वासाचे वातावरण
तयार झालेले आहे. अशा अपप्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे.
यांच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर २२००० ग्रामसेवक काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करतील.
सर्व राज्यभर ग्रामसेवकांचे आज दि.९ नोव्हेंबर २०२१ चे कामकाज बंद ठेऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. सातारा
जिल्ह्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक (कंत्राटी ग्रामसेवक वगळून) आजच्या एक दिवसीय काम बंद
आंदोलनात सहभागी होऊन आमदार संजय शिरसाठ यांच्या वरील वक्तव्याचा निषेध करीत आहेत व आमदार
शिरसाठ यांचेवर भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १०७.२८८,२९४,४९९,५०४,५०६ या कलमानुसार फौजदारी
गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार फडतरे ,जिल्हा सरचिटणीस अभिजीत चव्हाण ,उपाध्यक्ष रमेश साळुंखे ,पदाधिकारी गोविंद माने ,डी.डी.गायकवाड ,संदीप सावंत ,दिगंबर सुरवसे ,दिनेश काशिद ,मोहन कोळी ,संजय यादव ,अरूण कुंभार ,शिवाजी यादव ,व्ही.एम.चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो - सातारा येथे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पदाधिकारी....
Comments
Post a Comment