बिजवडी जि.बँक शाखेचे पिंटूशेठ जगदाळेंच्या हस्ते ध्वजारोहण...!
बिजवडी - सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांचे खंदे समर्थक व उत्तर माणचे युवानेते पिंटूशेठ जगदाळे यांच्या हस्ते सातारा जि.म.बँक बिजवडी या शाखेचे प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
त्याप्रसंगी सरपंच आप्पासो अडागळे , युवानेते संदीप भोसले ,माजी प्राचार्य हणमंतराव भोसले ,तात्याबा गाढवे ,दादासो भोसले , ज्ञानदेव गाढवे ,आप्पासो बाबर ,शाखाधिकारी घाडगे साहेब , इतर उपस्थित ग्रामस्थ व बँकेचे अधिकारी ,सेवक वर्ग उपस्थित होते.
* बिजवडी त ध्वजारोहण संपन्न*......
बिजवडी ता.माण येथील ग्रामपंचायत ,विकास सेवा सोसायटी ,कर्मवीर विद्यालय ,जि.प.शाळा , अंगणवाडी ,संत गाडगे महाराज विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी सरपंच आप्पासो अडागळे ,ग्रामपंचायत सदस्य ,विकास सेवा सोसायटी चे चेअरमन ,पदाधिकारी ,ग्रामस्थ , मुख्याध्यापक ,शिक्षक ,कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो - बिजवडी ता.माण येथील जि.बँकेचे ध्वजारोहण करताना उत्तर माणचे युवानेते पिंटूशेठ जगदाळे व उपस्थित संदीप भोसले , ग्रामस्थ व अधिकारी, सेवक वर्ग...
Comments
Post a Comment