*चैतन्य अकँडमीच्या वर्धापनदिनानिमित्त दि.७ रोजी विविध कार्यक्रम*..!
बिजवडी - दहिवडी ता.माण येथे चैतन्य करियर अकँडमीच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त दि.७ जानेवारी २०२२ रोजी विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती संदीप खाडे सर यांनी दिली.
वर्धापनदिनानिमित्त चैतन्य अकँडमीतर्फे भव्य रक्तदान ,आरोग्य तपासणी शिबीर , चैतन्य पुरस्कार २०२२ वितरण सोहळा , यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभ , पञकार दिनानिमित्त पञकार बंधुचा सत्कार ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व व्याख्यान असे विविध कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत.या कार्यक्रमास सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहनही चैतन्य करीयर अकँडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment