रयत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दहिवडी येथे क्रीडा महोत्सव संपन्न...!
बिजवडी,ता.16: दहिवडी ता.माण योथील रयत इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशालेमध्ये दि.12 डिसेंबर ते दि.14 डिसेंबर 2024 या कालावधीत मोठ्या उत्साहात तीन दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न झाला.
क्रिडा महोत्सवाचे उदघाटन दहिवडी शहरातील प्रगतशील बागायतदार व आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते राजेंद्र आबासाहेब जाधव यांनी केले. याप्रसंगी केंद्रप्रमुख वर्षा देवकर,शिक्षक सहकारी बँकेचे संचालक महेंद्र अवघडे,पोलीस पाटील किसनराव पोळ,भोंडवे,इम्तियाज नदाफ, विवेकानंद जगदाळे,वैभव गुरसाळकर,सौ.हेमा मोरे आदी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक, शिक्षक,सेवकवर्ग,विद्यार्थी उपस्थित होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून प्रशालेत विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत आणली.याप्रसंगी प्रशालेतील लेझीम पथकाने कर्मवीर पुतळा परिसरामध्ये आपली कला सादर केली.प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या साहित्य कवायती प्रकारांनी मान्यवर व पालक मंत्रमुग्ध झाले.या महोत्सवात पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्सफूर्तपणे सहभाग घेतला होता. तीनही दिवशी विद्यार्थ्यांनी सांघिक व वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये आपले प्राविण्य दाखवले.
यावेळी एन.एस.एस.इ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व राज्यस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यश प्राप्त केल्याबद्दल सर्व मुलींचा केंद्रप्रमुख वर्षा देवकर यांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. मुख्याध्यापिका भारती जाधव यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे तसेच सुप्रिया जाधव यांनी केले.पाहुण्यांची ओळख खिलारे यांनी केले तर आभार सूर्यवंशी व वाघमारे मॅडम यांनी केले.प्रशालेतील सर्व शिक्षिकांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment