ब्रम्हपुरी आश्रमशाळेत दि.20 रोजी श्री गाडगे बाबांच्या 68व्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम...!
बिजवडी,ता.18: श्री गाडगे महाराज मिशन, मुबंई संचलित श्री गाडगे महाराज प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व विद्यार्थी वसतिगृह ब्रह्मपुरी, ता. कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.२० डिसेंबर २०२४ रोजी निष्काम कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज यांच्या ६८ वा स्मृतिदिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती मुख्याध्यापक भारती मोहिते यांनी दिली.
या स्मृतीदिन विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गाडगे महाराज मिशन मुंबईचे चेअरमन मधुसूदन मोहिते-पाटील असणार असून प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास अभ्यासक व लेखक श्रीमंत कोकाटे,राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,माजी नगराध्यक्ष आनंदा कोरे उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवार, दि. २० डिसेंबर २०२४ सकाळी ७ ते ९ श्री गाडगेबाबा प्रतिमा पूजन व प्रार्थना,सकाळी ११ ते २ वाजता दिपक सपकाळ व सुशांत घोरपडे व सहकारी यांचा भावगीते भक्तीगीतांचा सप्तसूर कार्यक्रम,दुपारी ४ ते ६ स्मृतिदिन विशेष कार्यक्रम,सायं. ६ वा.हरिपाठ,सायं. ७ वा.ह.भ.प. हणमंत महाराज, गोजेगांवकर यांचे कीर्तन
रात्री ९ वा.पुष्पांजली - आदरांजली वाहिली जाणार आहे.याप्रसंगी ह.भ.प.संजयमहाराज वेळूकर,
ह.भ.प.मदनराव कदम (सर),ह.भ.प.विक्रम कणसे
ह.भ.प.समाधान शिंदे,ह.भ.प.रामकृष्ण महाराज तासगांवकर,ह.भ.प.मारुतीमहाराज निगडीकर, ह.भ.प.काशिनाथ पवार,ह.भ.प.रणजित पवार, ह.भ.प.किरण माने उपस्थित राहणार आहेत तर रहिमतपूर,नहरवाडी,कोंढवली,परतवडी,धामणेर,अंगापूर येथील भजनी मंडळ आपली कला सादर करणार आहेत.तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्र.मुख्याध्यापक दिपक माने यांनी केले आहे.
Comments
Post a Comment