प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक..!- मालविका झा ; राजवडी अंगणवाडीला भेट

बिजवडी  : प्रगत शिक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील 205 व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात 50 अंगणवाड्यांसोबत बालशिक्षणात उत्कृष्ट काम केले असून त्यांनी केलेल्या कामामुळे माण तालुक्यातील अंगणवाडीमध्ये अमुलाग्र बदल झाले आहेत.या अंगणवाडीमध्ये गुणवत्ता पूर्ण बालशिक्षण दिले जात असून म्हणून प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन टाटा एज्यूकेशन विभागाच्या प्रमुख मालविका झा यांनी केले आहे.
  टाटा एज्यूकेशन विभागा च्या प्रमुख मालविका झा व टाटा ट्रस्ट्सची एक सहयोगी संस्था असणारी कलिके संस्थेच्या प्रतिनिधींनी माण तालुक्यातील राजवडी गावातील अंगणवाडी क्र. 142 व उमाजीनगर अंगणवाडी(राजवडी)च्या भेटी दिल्या त्या दरम्यान बोलत होत्या.कलिके संस्थेतून जिल्हा व्यवस्थापक अशोक के, माल्लामा बी,तारासिंग जे,वरिष्ठ समन्वयक गिरीश आर, तालुका समन्वयक शांताम्मा, मुद्देश, बालक शिक्षण कार्यक्रम अधिकारी कोटरेश वाय,बाल विकास विभाग प्रमुख चिटकालांबा एन, प्रगतीची उपस्थिती प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले, उमाजीनगर अंगणवाडीच्या सेविका निलम दिपक जगदाळे,पल्लवी सुभाष यादव, मदतनीस जयश्री आकाराम भोसले उपस्थित होत्या.
  कलिके समृद्धी उपक्रम राबविण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. कलिके कर्नाटकातील यादगीर या जिल्ह्यात कार्यरत आहे,जो सर्व विकास निर्देशांकांनुसार राज्यातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे.या भेटीत राजवडी गावातील उमाजीनगर अंगणवाडीच्या सेविका निलम दिपक जगदाळे व राजवडी अंगणवाडी क्र. 142 पल्लवी सुभाष यादव व अंगणवाडी मदतनीस जयश्री आकाराम भोसले यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. या चर्चेदरम्यान कलिके टीम व श्रीम.मालविका झा यांनी अनेक गोष्टीबाबत माहिती घेतली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मुलांच्यासंबधित विविध प्रश्न वाचरून त्याची माहिती घेतली.यावर सेविकांनी प्रत्येक वयोगटातील मुलासोबत आम्ही स्वतंत्र नियोजन  करतो.3 ते 4 वयोगटातील मुले मुक्त खेळाच्या कोपऱ्यावर खेळतात.आम्ही दर महिन्याला नवीन गाणी घेतो.वर्षेभर ही गाणी वापरतो.अक्षर दृढीकरण खेळ, वर्क शीट याही विषयी चर्चा केली.मुलांना आनंद व मनोरंजन अभिनय गीत घेतो.अंगणवाडीत विविध उपक्रम, सेविका व मदतनीस यांची प्रशिक्षणे घेतली जातात अशीही माहिती दिली.ऍक्टिव्हिटी किट, इतर साहित्य, प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प अधिकारी भेटी, प्रगत शिक्षण संस्थेचा बालशिक्षण कार्यक्रम व त्यांचा प्रत्यक्ष वापर यावर या भेटीदरम्यान प्रकल्प समन्वयक तथा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले यांनीही मार्गदर्शन केले.

फोटो - राजवडी ता.माण येथील अंगणवाडी येथे भेटीदरम्यान उपस्थित मान्यवर...

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!