दि.कुर्ला ना.सहकारी बँकेच्या निवडणूकीत संकल्प पँनेलची प्रचारात आघाडी...!@ बँकेचे माजी अध्यक्ष महेंद्र बनगर यांच्या नेतृत्वातील संकल्प पॅनल विजयी होणार..@ शिवकृपा पतपेढीचे किंगमेकर अविनाश भोसले यांची संकल्प पँनेलला साथ
बिजवडी - दि कुर्ला नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक दि.16 मार्च 2025 रोजी होत आहे.या निवडणूकीत दि. कुर्ला नागरिक बँकेचे माजी अध्यक्ष महेंद्र बनगर यांच्या नेतृत्वातील संकल्प पॅनल विजयी होण्यासाठी सज्ज झाला आहे.त्यांना शिवकृपा पतसंस्थेचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले साहेब यांची मोलाची साथ मिळत आहे.संकल्प पँनेलने प्रचारातही आघाडी घेतली असून मोठ्या मताधिक्यांनी ही निवडणूक संकल्प पँनेल जिंकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या बँकेची स्थापना दि.2 ऑक्टोबर 1950 रोजी झाली असून यावर्षी बँक अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.बँकेच्या मुख्य शाखेसहित एकूण 14 शाखा आहेत.बँकेचे 48 हजार 710 क्रियाशील सभासद आहेत.तसेच बँकेचे भाग भांडवल 16 कोटी 95 लाख रुपये इतके आहे. बँकेला सतत दरवर्षी ऑडिट क्लासिफिकेशन 'A' ग्रेड मिळत असून सध्या बँकेचा नेट NPA हा 0% आहे.या बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे.दि.कुर्ला नागरिक बँकेचे माजी अध्यक्ष महेंद्र बनगर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कार्याच्या मुद्द्यावर व सभासदांच्या विश्वासावर या पँनेलला वाढता पाठिंबा मिळत आहे.त्यातच सहकार क्षेत्रात प्रचंड अनुभव असलेले व शिवकृपा पतपेढीचे माजी अध्यक्ष अविनाश भोसले यांची त्यांना साथ मिळत असल्याने संकल्प पँनेलची ताकद वाढली आहे.या निवडणूकीत दोन विद्यमान संचालका सहित इतर सर्व उमेदवाराही उच्चशिक्षित आहेत.त्यांना सहकार क्षेत्रातला चांगला अनुभव आहे त्याचा फायदा सभासदवर्गांना होणार आहे.त्यामुळे हा पँनेल निर्विवाद यश मिळवेल असे चित्र दिसून येत आहे.
चौकट - माण खटाव तालुक्यातील 25 हजार सभासद.....
दि.कुर्ला नागरी सहकारी बँकेची पाळेमुळे शहराबरोबच ग्रामीण भागातही पोहचली आहेत. आपले सभासद जिथे असतील तिथे जाऊन त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी मदत करत आहे.माण खटाव तालुक्यातही या बँकेचे 25 हजार सभासद असून संकल्प पँनेलच्या पाठीमागे हे सभासद खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. माणखटावचे सुपुत्रांनी या निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरले असल्याने माणखटावचे सभासद त्यांच्यासह संकल्प पँनेलला विजयी करण्यासाठी प्रचारात अग्रेसर दिसून येत आहेत.
चौकट - दि.कुर्ला नागरिक बँकेचे माजी अध्यक्ष महेंद्र बनगर यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बँकेच्या व सभासदांच्या हिताचे निर्णय घेत बँकेच्या यशस्वी वाटचालीत महत्वाची भूमिका बजावली आहे.त्यांच्यावर सभासदांचा पूर्ण विश्वास असून त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होत आहे.आपणही त्यांना खंबीरपणे साथ देत असून सहकार क्षेत्रातला अनुभव त्यांच्या पाठीशी उभा केला आहे.सर्व सभासदही बँकेच्या सर्वांगीण हितासाठी संकल्प पँनेलच्या पाठीशी उभे असून या पँनेलमधील सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.
- अविनाश भोसले,माजी अध्यक्ष शिवकृपा पतपेढी मुंबई
फोटो - संकल्प पँनेलचे उमेदवार व त्यांचे कपबशी हे चिन्ह......
Comments
Post a Comment