वडूज ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद ..! बालचमूंच्या प्रयोगशील कृतीचे व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ट्रिनिटी स्कूलचे पालकांकडून कौतुक

बिजवडी : वडूज ता.खटाव येथील ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजी भाषेबरोबरच मराठी भाषेला प्राधान्य दिले जात आहे.विद्यार्थ्यांच्या बौध्दिक विकासासाठी त्यांच्यात विज्ञानाची आवड निर्माण करून त्यांना कायम प्रयोगशील व कल्पक बनवण्याकडे गुरूजनांचे लक्ष असते.या हेतूने स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रदर्शनात पीस हाऊस,हार्मोनी हाऊस,इंटेग्रिटी हाऊस,विस्डम हाऊस मधील सर्व विद्यार्थ्यांनी उत्सफूर्तपणे सहभाग घेतला होता.
 ट्रिनिटी स्कूलच्या मार्गदर्शिका हर्षदा देशमुख-जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.याचे उदघाटन डॉ. रुपाली धामधरे यांचेहस्ते मुख्याध्यापिका मृदुला बॅनर्जी,सुरज भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.याप्रसंगी अस्मिता भांडारी, माधुरी शिंदे, वैष्णवी गाढवे,सर्व शिक्षक,सेवक,विद्यार्थी,पालक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक प्रेरणादायी गीत व नृत्याचे सादरीकरण केले.सौ.सोनाक्षी विजय इंगोले यांनी विज्ञानाचे महत्व सांगतिले.
   या प्रदर्शनात पीस हाऊस मधील शिक्षक बसंती पोळ,शाईन द्रविड,पल्लवी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ठिबक सिंचन हा प्रकल्प इंद्रनील गोडसे,सोहम भट,रेवान कुलकर्णी,कर्तव्य गुंजवटे यांनी केला.जलचक्र हा प्रकल्प आयुष भोसले,ओम जाधव,शौर्य गोडसे,प्रिन्स कांथे,राघव म्हमाणे यांनी केला.जलप्रदूषण हा प्रयोग दिविजा पाटील,हर्षा फडतरे,जागृती चव्हाण,श्रिषा मोरे यांनी केला. पाण्याची गाळणी प्रक्रिया हा प्रकल्प राजवीर गोडसे,प्रियांश ढोले ,स्वराज मगर,वेद शिंदे यांनी केला.पूर नियंत्रण हा प्रयोगविहान घणवट,तनिश काळे,आयुष शिंदे,कार्तिक माने ,सांडपाणी प्रक्रिया हा प्रकल्प श्लोक गांधी,पूर्वा माने,वीरा शिंगाडे ,जलविद्युत हा प्रकल्प स्वरा पवार,अक्षरा जाधव,नैतिक सुर्यवंशी,श्रेयश बागल,वरदराज त्रिंबके,पर्जन्यजल संकलन मॉडेल हा प्रकल्प धनश्री गोडसे,श्रेया पवार,नंदिनी साईन आरुषी आवळे,वायुमंडलीय दाब प्रयोग हा प्रकल्प माहि राऊत,अथर्व पवार,स्वरा जाधव,प्रणाली निम्बाळकर यांनी केला.पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांवरील चार्ट हा प्रकल्प विराज शिंगाडे,स्वराज शिंगाडे,ईशान डोंबे,विहान काळे,पाण्याच्या उपयोगांवरील चार्ट्स हा प्रकल्प अमृता ढोले,स्वानंदी थोरात,आरोही म्हमाणे,माहि खिलारे,जलवितरण प्रणाली हा प्रकल्पअनिश एस. मोरे यांनी केला.इलेक्ट्रिक वॉटर डिस्पेंसर हा प्रकल्प
अनुजा चव्हाण,सई फडतरे यांनी केला.
   हार्मोनी हाउस मधील शिक्षक रुपाली कदम, अनिसा मनेर, सुनीता काटकर, अमोल वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी म्हणजे काय? हा माहितीपर तक्ता हा प्रकल्प अवनी काटकर व अवनि कदम यांनी केला.स्मार्ट सिटीचे चित्रांसह आणि तक्त्यांसह तपशील-स्वराज काटकर,सक्षम काळे,आयुर जाधव यांनी केला.भारतामधील स्मार्ट सिटीज-देवांश चव्हाण,अभिनव माने यांनी केला.गणिती आकारांचा वापर करून स्मार्ट सिटीतील घरे-अनन्या राऊत,भक्ती देशमुख,काव्या बागल,श्रेया फडतरे यांनी केला.स्मार्ट सिटीमध्ये वापरलेले आदर्श विद्युत स्रोत-आदर्श माने,
आरव काटकर,श्रीवर्धन यांनी बनवले.स्मार्ट सिटीमधील वाहने-शलोक बोटे,विहान चव्हाण,आदित्य नळे,नील देशमुख यांनी बनवली.स्मार्ट सिटीतील अलेना शॉप्स-अलायना शेख,पायल थोरात,ईश्वरी राऊत यांनी बनवले होते.
स्मार्ट सिटीतील शाळा (कार्यकारी प्रतिकृती)
सानवि कोळेकर,तनिष्क चव्हाण,ओंकार अंधळकर,यश माने यांनी बनवली होती.स्मार्ट सिटीतील रस्ते / वाहतूक सिग्नल-सिद्धेश फडतरे,श्रीराज,दिग्विजय यांनी बनवले होते.
स्मार्ट सिटीमध्ये सौरऊर्जेचा वापर-सई शिंदे,मल्हार शिंदे,मृण्मयी बोटे यांनी केला.स्मार्ट सिटीतील सुरक्षा स्रोत-विराज घनवट, दिया चव्हाण यांनी बनवले.स्मार्ट सिटीतील जमीन व कृषी अवजारे-राज बोबडे,गौरव मोरे,श्रीजीत कुलकर्णी यांनी बनवली होती.शाश्वत स्मार्ट सिटी कार्यकारी प्रतिकृती-केदार बाबर,रुग्वेद खराडे,अनुज काटकर,राजवीर देशमुख,साईराज साळुंखे यांनी बनवली होती.स्मार्ट सिटीतील सेन्सर्सचा वापर-अनुष्का कुलकर्णी, सोनाक्षी इंगवले यांनी करून दाखवला.स्मार्ट सिटी संपूर्ण आराखड़ा-श्रेया शेटे, आर्या रायबोले यांनी सादर केला होता.
     इंटेग्रिटी हाऊस मधील शिक्षक आशालता चव्हाण, संध्या कुंभार, राहुल रघुनाथ, शिल्पा कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली अबुबकर मोहम्मद इमरान दर्यावर्डी याने प्रोटेक्टिव ट्रीज अँन्ड फॉरेस्ट हा प्रकल्प केला होता.पार्थ सौरभ जोशी याने लाइफ विदाउट प्लास्टिक हा प्रकल्प केला.श्रेयांश राजेंद्र कदम,आदर्श अमोल जाधव यांनी विद्युत सुरक्षा हा प्रकल्प केला होता.सद्वेत संतोष यादव याने मिनी सौर ओव्हन केला होता.शुभदा उदाजी पवार हिने बेस्ट आउट ऑफ वेस्ट हा प्रकल्प सादर केला होता.हर्षला सुनील गायकवाड हिने वर्ग सजावट हा प्रकल्प मांडला होता.कल्याणी नितीन कुंभार, ओवी सचिन काळभोर यांनी ई कचरा व्यवस्थापन प्रकल्प केला होता.स्वतेज जाधव, तनयी विजय गुजर यांनी हवामान कृती हा प्रकल्प केला होता.ऐश्वर्या ढोले, सिमरन फडतरे यांनी कचरा व्यवस्थापन प्रणाली हा प्रकल्प केला होता.नभा जोशी, तृषा घेवारे,आरुषी माळी,तनिष्का काळे यांनी सस्टेनेबल सिटी हा प्रकल्प केला.ओवी देशमुख, तेजल जगदाळे, प्रांजल मोरे आणि गौरवी बजरंग देशमुख यांनी मॅन्युअर मेकिंग हा प्रकल्प केला होता.आर्या इंगळे,सिद्धी घनवट यांनी इनजीॅ कन्झवेॅशन हाऊस हा प्रकल्प केला होता.सुफ़ियान मुन्नेर,राजवर्धन खैरमोडे यांनी डिजिटल इंडियन हा प्रकल्प केला होता.आर्यन शेटे, अर्णव शेटे - क्लिन रिव्हर मिशन हा प्रकल्प केला होता.स्वतेज शहा,अर्हम शहा यांनी इको-फ्रेंडली ट्रान्सपोर्ट हा प्रकल्प सादर केला.रणवीर देशमुख, जयराज शिंगाडे,श्लोक म्हमाणे यांनी अँग्रिकल्चर हा प्रकल्प सादर केला.प्रणिती जगताप आणि श्रावणी फडतरे यांनी ड्राॅइंग ऑफ वाॅटर फ्रांस वेल युजिंग सोलर हा प्रकल्प सादर केला.आरव राऊत, विराज जगदाळे, प्रिन्स तुपे यांनी वाइंडमिल हा प्रकल्प सादर केला.राजवीर देशमुख,आशिष साईं,आयुष गोडसे, पृथ्वीराज जगदाळे यांनी गुड हेल्थ अँन्ड वेलबिंग हा प्रकल्प सादर केला.अनन्या मोरे,अनुश्री देशमुख  यांनी हा उपक्रम सादर केला.
   विस्डम हाऊस मधील शिक्षक भूषण मोरे, योगिता देशमुख,चैताली शिंदे, प्राजक्ता ओंबासे यांनी विज्ञान प्रदर्शनाचा विषय अवकाश आणि अवकाशाचा पलीकडे या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.यात पूर्वा देवकर,कल्पक घार्गे,मंजिरी यांनी चंद्र आणि त्याच्या कला प्रकल्प सादर केला. तेजस्विनी ,प्रिन्स काळे ,शौर्य देशमुख यांनी दिवस आणि रात्र हा प्रकल्प सादर केला.प्रणव,केतकी गोडसे,स्पृहा पवार,श्रद्धा,शिवकल्प,प्रज्ञा यांनी  सूर्यग्रहण हा प्रकल्प सादर केला.उदयराज ,श्लोक बोटे,ईश्वरी यांनी चंद्र ग्रहण हा प्रकल्प सादर केला.
चैत्राली,स्वराली माळी,वेदिका यांनी महास्फोट सिद्धांत यांनी प्रकल्प सादर केला.तनिष्का भोसले,अर्पिता देशमुख यांनी भूस्थिर उपग्रह यांनी प्रकल्प सादर केला.ज्ञानदा कांबळे,सौमित्र कांबळे,शिवम पवार,रोहन कुंभार यांनी लघुग्रह आणि त्याचे प्रकार हा प्रकल्प सादर केला.तनिष्क पवार याने सूर्यमाला,ईशान ढगे याने अतिनवतारा,देवराज खाडे,देवांश ननावरे याने आकाशगंगा हे प्रकल्प सादर केले.चैताली,स्वराली माने यांनी कृष्णविवर सादर केले.अदिती काळे , प्रांजल ,अनघा पाटील यांनी ओझोन थर सादर केला.शिवम कुंभार,रुद्र निंबाळकर,राजवीर यांनी अंतराळवीर हा प्रकल्प सादर केला.प्रभास जोशी,सिद्धार्थ मोरे विराज,रुद्र फडतरे यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हा प्रकल्प सादर केला.नीरज सेन,अभिनव,कार्तिक घार्गे,शुभम दडस,विरप्रताप ,अर्णव काळे यांनी चंद्रयान सादर केले. तनिष्का भोसले,पृथ्वी खाडे यांनी तारांगण सादर केले होते.
  प्रि-प्रायमरी - विज्ञान प्रदर्शनात प्राजक्ता ओंबासे, सुनिता काटकर,शिल्पा कर्णे यांनी मार्गदर्शन केले.यात माझ्याबद्दल या उपक्रमात विहान नरळे, दक्ष देशमुख,श्रितेज बोटे, आरोही खाडे,वीर शिंदे ,अकांशा भोसले सहभागी झाले होते.पौष्टिक अन्न यात श्रियांश बागल,शिवांश अमित भोसले ,शिवांश अमर भोसले सहभागी होते.झाड आणि त्याचे भाग यात
श्रिषा काटकर,शिवम माने ,आरोही घार्गे यांनी सहभाग घेतला होता.राष्ट्रीय चिन्हे यात
शरयू कर्णे,शिव निलेश देशमुख,शिव निलेश जाधव यांनी सहभाग घेतला होता.अपौष्टिक अन्न यात
रिधान,रियांश ,इशानी जगदाळे ,रुद्रांश,रुद्विका यांनी सहभाग घेतला होता. वाहतूक सिग्नल या उपक्रमात रणविजय सिंग,अन्वित जाधव ,शिवप्रताप देशमुख, श्लोक जगदाळे यांनी सहभाग घेतला होता.वाहतूक प्रकार यात 
कृशिका, समर्थ ,अद्वैत डुबळे, श्रियांश खराडे ,मिष्टी ,अद्विका भोसले यांनी सहभाग घेतला होता.माझी शाळा बनवण्यात अन्विका पवार,अन्वी शेंडगे ,मंदार, काव्या यांनी सहभाग घेतला होता. ऋतू बनवण्यात आयुष मोरे,कार्तिक ,राजनील , पार्थ घार्गे,निर्वेद,शष्ठी यांनी सहभाग घेतला होता. माणसाची वाढ यात श्रिषा चव्हाण, जयवर्धन देशमुख ,राजवीर पाटील सहभाग घेतला. समाजसेवक यात पृथ्वीराज ,विहान , अमरजीत,अंश,ओंकार, श्रीपाद, शौर्या यांनी सहभाग घेतला होता.बुडणे, तरंगणे व विरघळणे या क्रियेत वेद,दक्ष,शौर्य गोडसे यांनी सहभाग घेतला होता.हवामान स्थिती या उपक्रमात इशिता,शौर्य इंगळे,शौर्य बागल ,शिवांश माने यांनी सहभाग घेतला होता.फळे या उपक्रमात ऋत्वी,श्रीधर,रेयांश यांनी सहभाग घेतला होता.भाज्या या उपक्रमात शिवाश,यश,शिवप्रताप यांनी सहभाग घेतला होता.
 ब्रेनी स्पार्क (फाउंडेशन ग्रुप) मध्ये इयत्ता १ ली व २ री तील विद्यार्थ्यांनी शिक्षक चैताली शिंदे, योगिता देशमुख यांच्या मार्गदर्शनखाली प्रकल्प बनवले आहेत.यात अन्न आणि पाणी प्रकल्पात आदर्श सानप, आराध्या देशमुख, पूर्वी कोळेकर, आर्वी काटकर,आरूष भोसले,निवारा या प्रकल्पात आरव महावीर, आरोही भोसले,आरुष मने , प्रदनया निंबाळकर यांनी सहभाग घेतला होता. उत्सव या प्रकल्पात आर्ष मुलाणी,आभिज्ञा शिकलगार, अभिनव जाधव,वेदिका बंडगिरे,शशांक इंगळे यांनी सहभाग घेतला होता.पृथ्वी या प्रकल्पात अर्णावी डफल, वीरधवल देशमुख,शौर्य भोसले,सदानंद अवळे, निरली घार्गे यांनी सहभाग घेतला होता. वॉटर कन्सर्वेशन या प्रकल्पात शरविल पाटील,आराध्य सूर्यवंशी,अथर्व शिंगाडे,वरद गुंजले,सिया बोटे यांनी सहभाग घेतला होता. एअर पॉल्युशन या प्रकल्पात शिवण्या निंबाळकर,शौर्य जगदाळे, समर्थ मासुगडे,सर्वेश काळभोर यांनी सहभाग घेतला होता. वॉटर सायकल या प्रकल्पातअद्विक जगदाळे, आदविक भोसले, अगस्त्या बागल, अरहान मुल्ला यांनी सहभाग घेतला होता. समुद्र आणि वातावरण या प्रकल्पात चैतन्य काळे, इशिका पाटील, अद्विका पोवार, स्वराज घार्गे, आर्यन शिंगाडे यांनी सहभाग घेतला होता.वृक्षांचे प्रकार या प्रकल्पात अरीज पटेल,भूमी खिलारे, कृतिका मोरे, अथरव शिंगाडे, समृध्दी पवार यांनी सहभाग घेतला होता. खाद्य पदार्थांचे प्रकार या प्रकल्पात माही राईबोले, राजवीर खंदारे, ज्ञानेश्वरी निंबाळकर, ओम निकम, शिवम पंडित यांनी सहभाग घेतला होता. 
वस्त्र या प्रकल्पात स्वरा कदम, रिषभ जगदाळे, देवांशी काळे,पृथ्वीराज माने यांनी सहभाग घेतला होता. 
सभोवतालचे प्राणी या प्रकल्पात तनवी पोळ, विराज कदम, रियांशी महामाने, रजनंदिन तळेकर, विघ्नेश कदम यांनी सहभाग घेतला होता. 
पाणी आणि हवा या प्रकल्पात सृष्टी गोस्तूर्वे, स्वरा खराडे,विराज भोसले,शिवांश शितोळे,शिवतेज बागल,आरोही बोबडे यांनी सहभाग घेतला होता. 
 स्कूलमधील सर्वच विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन आपले प्रकल्प साजर केले होते.यावेळी विविध मान्यवर,पालक,शिक्षक सेवकवर्गांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 सूत्रसंचालन कु.श्लोका गांधी हिने करून आभार मुख्याध्यापिका मृदुला बँनर्जी यांनी मानले.

चौकट - सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे उपकरणांची मांडणी करून विविध प्रयोग सादर केले होते.या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण दिले जात असून याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात निश्चितच होणार आहे.
- सौ.हिंदवी गुंजवटे,पालक

चौकट - या प्रदर्शनासाठी आम्हाला आमच्या मार्गदर्शिका हर्षदा देशमुख-जाधव दिदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले असून सर्वच शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करत हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकवर्गांनीही चांगला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
- मुख्याध्यापिका मृदला बँनर्जी ,ट्रिनीटी इंटरनॅशनल स्कूल वडूज

फोटो - वडूज ता.खटाव येथील ट्रिनीटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प.....

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!