*कृषिदुतांनी रांगोळीच्या रेषांतून उमटवले बिबी गाव..!*

बिजवडी – गावाचे सामाजिक भान व लोकसहभाग वाढवण्यासाठी कृषिमहाविद्यालय बारामतीच्या विद्यार्थ्यांनी मिळून बिबी ता.फलटण या गावाचा नकाशा रांगोळीच्या माध्यमातून रंगविला. ही अभिनव कल्पना कार्यक्रम अधिकारी श्री. एस.पी गायकवाड सर व श्री. एस. व्ही. बुरुंगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. तसेच कृषिदूत साहिल भिकले, चारुदत्ता बाविस्कर, तुषार शिर्के, कौस्तुभ शिपूरकर, कार्तिक चौधरी, अनुष्क लोले, आर्यन चौधरी, व ऋषी पाठक यांनी अनोख्या शैलीत रांगोळी रेखाटून आपली कला दाखवली.
रांगोळीच्या माध्यमातून गावातील ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते, शाळा, मंदिरे, दवाखाने, तलाव, शेतजमिनी, तसेच महत्त्वाची ठिकाणे रंगीत व सुबक पद्धतीने दर्शवण्यात आली. या उपक्रमाचे गावकऱ्यांनी व पाहुण्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
या उपक्रमामागील उद्देश गावाचा भूगोल समजून घेणे, पर्यावरणाचे महत्त्व पटवून देणे व लोकसहभाग वाढवणे हाच होता, असे आयोजकांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!