बारामतीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार व भरारी यशाची कार्यक्रम संपन्न..! लातूर सायन्स अकँडमीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव

बारामतीत राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार व भरारी यशाची कार्यक्रम संपन्न..!
लातूर सायन्स अकँडमीत गुणवंत विद्यार्थी व आदर्श शिक्षकांचा गुणगौरव

बारामती : “भरारी यशाची व राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” हा सोहळा लातूर सायन्स अ‍ॅकॅडमी बारामती येथे SPCT’s EXED ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, बारामती आणि लातूर सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात संपन्न झाला.या सोहळ्यात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
 या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून दौंड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, वर्धमान विद्यालय वालचंदनगर चे प्राचार्य प्रा. कुंभार सर उपस्थित होते.या कार्यक्रमात नीट,जीई व एमएचटी -सेट परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता १२ वीमध्ये टॉपर ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ जिल्ह्यातील तब्बल ७२ गुणवंत शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल “राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार २०२५” प्रदान करून गौरविण्यात आले. सत्कार सोहळ्यावेळी अनेक शिक्षक भावूक झाले व त्यांनी अकॅडमीच्या शिक्षकवृंदाच्या गुणवत्तापूर्ण कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.
 कार्यक्रमाची प्रस्तावना SPCT’s EXED Jr. College चे प्राचार्य व लातूर सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा.संतोष पंढरीनाथ गोरे यांनी केले.ते म्हणाले की,“लातूर सायन्स अकॅडमी ही बारामतीतील पहिली संस्था आहे जिथे नीट,जीई व सेट साठी स्वतंत्र तज्ञ व डॉक्टरेट प्राध्यापक आहेत. स्वतःचे ज्यु.कॉलेज,एचएससी बोर्ड,कॉलेज कॅम्पस,निवासी सुविधा,मेस अशा सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. अल्पावधीतच अकॅडमीने बारामतीला नीट,जीई, सेट टॉपर्स दिले आहेत.सन २०२१ मध्ये कुमारी साक्षी राकाटे ही एआयआयएमएस मध्ये निवड होणारी बारामतीतील पहिली विद्यार्थिनी ठरली आहे.
 “सध्या अकॅडमीमध्ये एकूण ७३५ विद्यार्थी NEET, JEE व CET ची तयारी करीत असून त्यापैकी ३४३ विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेत आहेत.ग्रामीण भागातील अनेक मुले व मुली येथे शिक्षण घेत आहेत.ज्या विद्यार्थ्यांना खरोखर आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून आयआयटी ,नीट सारख्या परीक्षेची तयारी इयत्ता ८ वी पासून सुरू करायची आहे त्यांनी फक्त एकदा तरी या कॅम्पसला भेट द्यावी. येथील कॉलेज कॅम्पस, शैक्षणिक वातावरण व निवासाची सोय अनुभवून निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
 या सोहळ्यास ७०० हून अधिक पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन लातूर सायन्स अकॅडमीचे केमिस्ट्री विभागप्रमुख व संचालक प्रा. अंकुशराव पवार, देशमुख कॉमर्स अकॅडमीचे संचालक डॉ. विनोद देशमुख, मराठी विभागप्रमुख प्रा. छाया देवरे तसेच संपूर्ण शिक्षक स्टाफने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शब्दधन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.मनोजकुमार शिवाजीराव वाबळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन लातूर सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा.अक्षय गुळवे यांनी केले.

फोटो - बारामती येथील लातूर सायन्स अकँडमीत गुणगौरव सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग व विद्यार्थी....

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!