सतिश ढोक अनार गौरव २०२५ पुरस्काराने सन्मानित..!

बिजवडी,ता.28: बिदाल ता.माण येथील प्रगतशील डाळींब उत्पादक शेतकरी सतिश ढोक सर यांना  सोलापूर याठिकाणी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांचेवतीने अनार गौरव २०२५ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 सोलापूर येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या २१ व्या स्थापना दिवस समारोहानिमित्त आयोजित
'राष्ट्रीय डाळिंब उत्पादकांचा मेळावा’ व 'राष्ट्रीय डाळिंब दिवस' साजरा करण्यात आला.यावेळी संशोधन केंद्राचा 21 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील काही निवडक शेतकऱ्यांना अनार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये बिदाल येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचा गौरव करण्यात आला.
 याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे प्रकल्प संचालक व मँगनेट महाव्यवस्थापक विनायक कोकरे,फलोत्पादन संचालक अंकुश माने 
कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूरचे संचालक डॉ.राजीव मराठे,जिल्हा कृषी अधिक्षक शुक्राचार्य भोसले,कृषी विश्व विद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ.विठ्ठल बेनागी,अखिल भारतीय डाळिंब उत्पादक संघ पुणे अध्यक्ष प्रभाकर चांदणे,
श्कर्नाटक डाळींब उत्पादक संघ बेंगलुरूचे उपाध्यक्ष नागराज एस.एम.तसेच प्रगतशील डाळिंब उत्पादक शहाजीराव जाचक,प्रतापराव काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सतिश ढोक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 या पुरस्कारामुळे सतिश ढोक यांचे माण तालुक्यातील सर्व डाळींब उत्पादक शेतकरी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
फोटो - सोलापूर येथे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रात मान्यवरांच्या हस्ते अनार गौरव २०२५ पुरस्कार स्विकारताना सतिश ढोक 

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!