विठू - माऊलीचा भक्त : गणपत महानवर (बापू)

आज दि .3/5/2021 रोजी  स्व. कै. गणपत म्हलारी महानवर(बापू)यांचे प्रथम पुण्यसमरण यानिमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण मी अनुभवलेले बापू....
- दादासो दडस ,मुख्याध्यापक श्री संत गाडगे महाराज प्राथमिक अनु.जाती विद्यालय बिजवडी ता.माण जि.सातारा

बापूंची आणि माझी पहिली ओळख 25 जून 2000 रोजी झाली. मी पहिल्यांदा त्यांच्या घरी आमचे मार्गदर्शक लक्ष्मण सरांबरोबर गेलो. त्यावेळी ओळख झाली पहिल्याच ओळखीत बापूंनी मला आपलेशे केले .बापूंचा स्वभाव अगदी गरीब,मायाळू वाटला ते नेहमी विचारपूस करत घरच्यांना पाहुणचार करण्यास लावत. कोणी जरी घरी गेले तरी चहापान व जेवण केल्याशिवाय ते माघारी जाऊन देत नसत.नेहमी समोर कोणतीही व्यक्ती आली की रामराम करणे हा त्यांचा आदरातिथ्य स्वभाव होता . बापुंजवळ बसल्यानंतर नेहमी दोन चार अध्यात्मातल्या गोष्टी ऐकायला बरे वाटायचे ते कधी कोणालाही कधी वाईट,निंदनिय असे कधी बोलले असे मी वीस वर्षाच्या अनुभवात कधी ऐकले नाही.त्यांना आध्यात्माची फार आवड. विठू - माऊली म्हणजे त्यांचे जीव की प्राण.न चुकता वारीला जाणाऱ्या बापूंना भजन ,प्रवचनाची फार आवड.साधी सरळ मार्गी माणूस, कष्टाला मह्त्व देणारी व्यक्ती म्हणजे बापू,त्यांनी स्वतः कष्टाणे गरिबीतून कुटुंब चांगल्या मार्गाला लावले ,मी बापूंन बद्दल कोणाच्याही तोंडुन कधी वाईट ऐकलं नाही आणि बापूही कोणाला वाईट म्हणत नव्हते.ते नेहमी म्हणत भगवंत ठेवील तसे राहिले पाहिजे. कोणाच्या नशिबाला नशीब घासून मिळत नाही तर आपल्या जेवढे दिले त्यात समाधान मानावे त्यामुळे त्यांचे कुटुंब नेहमी आनंदी असायचे त्यांचा चार मुले, दोन मुली ,पत्नी,सुना, नातवंड असा मोठा परिवार आनंदात राहत होता .ते भावाला म्हणजे अप्पाना प्रेमाने बोलत. भाऊ भाऊ बसले म्हणजे राम लक्ष्मण जोडी वाटे ,मला घरी गेल्यावर बापूंशी गप्पा गोष्टी केल्याशिवाय रहावत नव्हते. मी सुरवातीला दोन ते तीन वर्षे  आठवड्यातून चार दिवस त्यांच्या घरी मुक्काम करायचो मग मी आणि बापू रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो की मी माझ्या घरच्या आठवणी विसरायचो आणि आपल्याच घरी आहे असे वाटायचे. पुन्हा काही दिवस भेट होईना म्हणजे बापू म्हणत पाहून आता विसरले की काय मग भेट घेण्यासाठी जावे लागत. त्यांना पांडुरंगाची ओढ कायमचीच असायची.त्यामुळे ते पंढरपूर ला प्रत्येक वारीला जाण्यासाठी चार दिवस अगोदर तयारीला लागत. ते प्रत्येक लग्नकार्यात मंगल अष्टका एवढी सुंदर म्हणत सर्वजण ऐकतच बसायचे.माझ्या लग्नातही सुंदर अशी मंगल अष्टका म्हटले होते. बस अश्या अनेक आठवणी ठेवून बापू गेल्या वर्षी आपणा सर्वांना सोडून स्वर्गवासी झाले असो जो आवडे सर्वाना तो आवडे परमेश्वराला याप्रमाणे ही प्रेमळ ,मनमिळाऊ, कष्टाळू माणूस परमेश्वराला आवडली व तो आपल्या मधून तो त्याच्या घरी घेऊन गेला. बापूंच्या पाठीमागे मोठा परिवार आहे ते आज त्यांचे प्रथम पुण्यसमरण घालत आहेत काही नैसर्गिक संकटामुळे आपण जाऊ शकत नाही परंतु बापूच्या पुण्यसमरण दिनी सर्वांच्या वतीने व माझ्या सर्व कुटूंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण व बापूंच्या पुण्याईने सर्व कुटूंबियांना सुखसमाधान, शांती, धनसंपदा, आरोग्य ,मिळो व बापुना परमेश्वर घरी स्वर्ग घरी सेवा करण्याची संधी मिळो हीच मनपूर्वक आदरांजली अर्पण👏👏👏👏👏💐💐💐💐

Comments

  1. भावपुर्ण श्रद्धांजली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!