माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजला..!जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार निवडणूक ; मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
बिजवडी - महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ चे व महाराष्ट्र कृषि उत्पन्न बाजार समित्या समितीची निवडणूक) नियम २०१७ प्रारुप मतदार यादी अद्यावतीकरण कार्यक्रम संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अंतिम करणेचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. या समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगुल वाजणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सौ.विजया बाबर यांनी दिली.
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था. दहिवडी ता.माण व पंचायत समिती, दहिवडी या कार्यालयातील नोटीस बोर्डावरती दि.२५ मे २०२१ रोजी स. ११.०० वाजता प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली आहे.तर
दि.२५ मे २०२१ ते दि.३ जून २०२१ या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत यादीवर जिल्हा निवडणूक अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचे कार्यालयातील जिल्हा निवडणूक कक्षात प्रारूप मतदार यादीवर दावे / हरकती आक्षेप दाखल करण्यात येतील.दि.१४ जून २०२१ रोजी प्राप्त दावे / हरकती आक्षेप यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांनी निर्णय देतील.
दि.१८ जून २०२१ रोजी संस्था कार्यालय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, दहिवडी ता. माण/ पंचायत समिती दहिवडी व या कार्यालयातील नोटीस बोर्ड व या कार्यालयातील नोटीस बोर्डावर
अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येणार असल्याचीही माहितीही सौ.विजया बाबर यांनी दिली.
जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल़्या आठवड्यात ही निवडणूक होत असून कोरोना काळात विविध पक्षांच्या नेतेमंडळींची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित.
Comments
Post a Comment