लॉकडाऊन उठताच महावितरणची सक्तीची वीजबील वसूली..!- नारायण अहिवळे

बिजवडी - कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गेले दिड वर्षेपासून वारंवार लॉकडाऊन टाकले जात आहे.त्यामुळे सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. उद्योग , व्यवसाय ,रोजगार बंद असल्याने आर्थिक समस्येने नागरीकांना त्रासले आहे.त्यातच लॉकडाऊन उठताच महावितरणने सक्तीची वीजबील वसूली मोहिम राबवल्याने नागरीक हतबल होत आहेत. सर्वसामन्य ,गोरगरीब , व्यावसायिकांनी वीजबील भरायचे कसे हा प्रश्न पडला आहे.महावितरण ने वीजबील वसूली साठी नागरीकांना थोडी सवलत देता आली नाही तरी किमान वीजबीलात दोनतीन टप्पे करून देण्याची मागणी स्वाभिमानी  होलार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष नारायण अहिवळे यांनी केली आहे.
  माण तालुक्यासह दहिवडी विभागात वीजबील वसूली मोहीम सुरू आहे. लॉकडाऊन उठवल्याने आता कुठे सर्वकाही सुरू झाले असले तरी व  रोजगारांना लगेच रोजगार उपलब्ध होणार नाही. व्यवसाय ,व्यापार , दुकानदारी म्हणावी तशी अजून सुरू झाली नाही.त्यामुळे आर्थिक उलाढाल ठप्प आहे .ते कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.यात
 त्यातच महावितरण कडून सक्तीचे वीज बिल वसुली सुरू आहे. कोणताही विचार न करता, पूर्व कल्पना न देता सर्रास वीज कनेक्शन कट करण्याचा धडाकाच महावितरण कडून सुरू आहे.त्यामुळे सामान्य माणसाने काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरीक ,व्यापारी ,व्यावसायिकांना यातून सावरण्यासाठी थोडा वेळ देऊन नंतर वीजबील वसूलीची मोहीम राबवणे गरजेचे आहे.
महावितरण ने लॉकडाऊनमध्ये हतबल झालेल्या नागरीकांचे वीजबीलासाठी वीजकनेक्शन कट न करता बील भरण्यासाठी थोडी सवलत मिळवून देण्याची मागणी ही नारायण अहिवळे यांनी केली आहे.

चौकट - तर....मुजोर ,बेशिस्त वीज अधिकाऱ्याला धडा शिकविणार...
दहिवडी विभागासाठी वीजवितरण ने नेमूण दिलेल्या अधिकाऱ्याला सर्वसामान्य नागरीका विषयी कसलीही आपुलकी नाही.त्यांच्याशी ते उध्दटपणे वागताना दिसून येत आहेत.वसूली करणे हे तुमचे कर्तव्य आहे परंतू सामाजिक बांधीलकी म्हणून ही कायतरी आपले कर्तव्य आहे हे त्यांनी विसरू नये. नागरीकांच्या समस्या जाणून त्यांना सहकार्य करावे.अन्यथा अशा मुजोर व बेशिस्त अधिकाऱ्यांना धडा शिकवत त्यांच्या विरोधात कारवाईसाठी व बदलीसाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

चैतन्य अकँडमीतली शिस्त विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतेय...!- सौ.सोनियाताई गोरे ; दहिवडीत चैतन्य माणदेश पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

छोटूकाकांच्या आध्यात्मिक कार्याच्या पाठीशी कायम....... ! - सौ.सोनियाताई गोरे ; छोटूकाका कुलकर्णी चैतन्य माणदेश पुरस्काराने सन्मानित

...79 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दादांची 45 वर्षांची अखंडीत पत्रकारिता...!