माण तालुका राष्ट्रीय कॉग्रेसच्या अध्यक्षपदी दादासाहेब काळे यांची निवड...!
बिजवडी - महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसचे चिटणीस दादासाहेब काळे (रा.आंधळी ,ता.माण)यांची माण तालुका राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
माण-खटाव विधानसभा युवक कॉग्रेसचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळताना दादासाहेब काळे यांनी युवकांची मोठी फळी तयार केली होती.युवकांच्या माध्यमातून ते पक्षवाढीचे काम करत असतानाच त्यांच्या कार्याची दखल पक्षश्रेष्टींनी घेत त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेसच्या चिटणीसपदावर काम करण्याची संधी दिली होती. या कालावधीतही त्यांनी विविध मेळावे , शिबीरे ,कार्यक्रम घेऊन आपले कार्य दाखवून दिले होते.त्यामुळे पुन्हा एकदा याच कार्याची दखल घेत वरिष्ठांनी त्यांची चिटणीसपदी फेरनिवड केली होती.
त्यांचे युवासंघटन व पक्षहिताचे काम पाहून सर्वांना सोबत घेऊन माण तालुका काँग्रेसमय करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका चांगल्या युवा कार्यकर्त्याची निवड करत त्यांच्यावर माण तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.या निवडीचे पत्र मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आले.
दादासाहेब काळे यांनी धनगर आरक्षण कृती समितीतही महत्वाची जबाबदारी पेलली होती.तर आपल्या सौभाग्यवती सौ.मिनाक्षी दादासाहेब काळे यांना सन २००७ साली आंधळी गावचे बिनविरोध सरपंच म्हणून , सन २०१२ साली आंधळी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून तर सन २०१७ ला आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंचपदाचीही संधी मिळवून दिली.त्यांनीही या आपल्या कारकीर्दीत जनहिताची कामे केली आहेत.
माण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदी दादासाहेब काळे यांची निवड झालेबद्दल
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोलेजी अध्यक्ष
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज बाबा चव्हाण ,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ,गृहराज्य मंत्री सतेज पाटील कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे ,युवक काँग्रेस प्रदेशउपाध्यक्ष शिवराज मोरे ,काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डाॕ. सुरेश जाधव ,प्रांतिक सदस्य रणजीत देशमुख ,,बाळासाहेब माने , जिल्हा उपाध्यक्ष एम.के.भोसले ,युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे , माजी सभापती अशोक गोडसे ,महिला जिल्हा अध्यक्ष धनश्री महाडीक ,मनोज तपासे नरेश देसाई जिल्हा सरचिटणीस
खटाव तालुकाध्यक्ष विवेक देशमुख , डॉ.महेश गुरव ,प्रा. विश्वबंर बाबर , शिवाजीराव महानवर ,निलेश काटे, विकास गोंजारी ,नकुसाताई जाधव,
विष्णुपंत अवघडे ,योगेश भोसले ,निलेश दडस ,अशोक पोतेकर ,मंगेश जगदाळे
,बाबा माने ,सागर सांवत ,पंकज पोळ ,धर्माबापु जगदाळे ,सचिन घाडगे संदिप सजगने ,पै संजय ढवाण आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.
फोटो - मुंबई येथे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याहस्ते माण तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र स्विकारताना दादासाहेब काळे.....
Comments
Post a Comment