वडूज येथील त्रिनिटी इंटरनँशनल स्कूलमध्ये कार्निवल महोत्सव संपन्न..!
बिजवडी,ता.21: वडूज ता.खटाव येथील त्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कार्निवल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.या महोत्सवाला विद्यार्थी तसेच पालकवर्गांनी उत्सफूर्तफणे सहभाग दाखवला होता.
या महोत्सवामध्ये भारताच्या पूर्व विभाग,पश्चिम विभाग,दक्षिण विभाग व उत्तर विभागातल्या कला, संस्कृती दर्शवणारे व त्यांचे महत्त्व जाणवणारे चित्रण करत त्याचे प्रदर्शन मांडले होते.हे पाहण्यासाठी वडूज नगरीतील सर्व नागरिकांनी व शाळेच्या पालकांनी उत्सफूर्तपणे उपस्थिती दर्शवली होती.प्रत्येक विभागामध्ये त्या विभागाचे महत्त्व जाणवणारे तसेच महत्त्वाच्या बाबींना उजाळा देणाऱ्या प्रतिकृती उभारल्याने मुलांना आपल्या देशातील विविध भागाची तसेच संस्कृतीची माहिती होण्यास मदत मिळाली.
तसेच विद्यार्थी व पालक यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे व खेळाचे स्टॉल लावले होते याचाही सर्वांनी आनंद घेतला.
ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मध्ये असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य सौ. मृदुला बॅनर्जी व व्यवस्थापक महेश ममदापुरे, सुरज भोसले उपस्थित होते.
या महोत्सवात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबवल्याबद्दल पालक व ग्रामस्थांच्या वतीने स्कूलचे अभिनंदन करण्यात आले.
Comments
Post a Comment